AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marcus Stoinis चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात असूनही वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त, ऑस्ट्रेलियाला धक्का

Icc Champions Trophy 2025 : कधी काय होईल सांगता येत नाही, तसंच काहीस झालंय. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड होऊनही खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

Marcus Stoinis चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात असूनही वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त, ऑस्ट्रेलियाला धक्का
marcus stoinis and virat kohliImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 06, 2025 | 2:18 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे एकूण 8 संघ त्यांच्या पद्धतीने सराव करत आहेत. या स्पर्धेतून काही खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. खेळाडूंची इच्छा असूनही फक्त दुखापतीमुळे या खेळाडूंना मनाविरुद्ध बाहेर बसावं लागणार आहे. तर काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना या स्पर्धेत खेळायची इच्छा होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही. मात्र एका खेळाडूने कहरच केलाय, असंच म्हणावं लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड होऊनही या खेळाडूने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला मोठा झटका लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा टी 20i कर्णधार मिचेल मार्श हा आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यात एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोघेही या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात मार्कस स्टोयनिसने निवृत्ती जाहीर करत ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.

स्टोयनिसच्या जागी कुणाला संधी?

दरम्यान स्टोयनिसने निवृत्ती घेतल्याने त्याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला संधी द्यायची? असा प्रश्न आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासमोर आहे. आता स्टोयनिसमुळे कुणाचं नशिब फळफळणार? हे अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

मार्कस स्टोयनिसची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेळापत्रक

22 फेब्रुवारी, विरुद्ध इंग्लंड, लाहोर

25 फेब्रुवारी, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

28 फेब्रुवारी, विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.

कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर.
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?.
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा.
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?.
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीचा आज निकाल, महायुती की मविआ कोणाची बाजी?
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीचा आज निकाल, महायुती की मविआ कोणाची बाजी?.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.