Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Champions Trophy 2025 स्पर्धेसाठी कॅप्टन बदलला, कुणाला संधी?

Icc Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 15 सदस्यीय सुधारित संघांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या.

Icc Champions Trophy 2025 स्पर्धेसाठी कॅप्टन बदलला, कुणाला संधी?
Rohit Sharma And Pat Cummins
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 9:00 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मंगळवारी 11 फेब्रुवारीला रात्री उशिरा 2 बदल करण्यात आले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर व्हावं लागलं. तर यशस्वी जयस्वाल याला मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या जागी हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे. तर यशस्वीऐवजी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला संधी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये तब्बल 5 बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने कर्णधारही बदलला आहे.

दुखापत, निवृत्ती आणि वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं.मार्कस स्टोयनिस याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होऊनही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. तर कर्णधार पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि ऑलराउंडर मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे या 5 जणांच्या जागी बदली खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाने बुधवारी 12 फेब्रुवारीला 15 सदस्यीय सुधारित संघाची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

कॅप्टन कोण?

पॅट कमिन्स याला घोट्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे पॅटऐवजी स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हन स्मिथ याने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला श्रीलंका दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने मालिका विजय मिळवून दिला.

इतर 4 खेळाडूंचं काय?

हेझलवूड याला हिप इंजरीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. मिचेल मार्श याला बॅक इंजरीमुळे स्पर्धेला मुकावं लागलं आहे. तर मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतलीय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघात सीन एबॉट, बेन ड्वार्शिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉनसन आणि तनवीर संघा या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2025 ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, बेन ड्वार्शिस, नॅथन एलिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि एडम झाम्पा.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.