AUS vs PAK : बेथ मूनी-अलाना किंग जोडीची निर्णायक भागीदारी, पाकिस्तानसमोर 222 धावांचं आव्हान
Australia Women vs Pakistan Women 1st Inning : बेथ मूनी आणि अलाना किंग या जोडीने ऑस्ट्रेलियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावत लाज राखली. या जोडीमुळे ऑस्ट्रेलियाला 150 पार मजल मारता आली.

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील नवव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 222 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 221 रन्स केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची वाईट अवस्था झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या 120 धावा होतील का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र बेथ मूनी आणि अलाका किंग या जोडीने नवव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आता गतविजेता एकूण दुसरा विजय मिळवणार की पाकिस्तान पराभवाची हॅटट्रिक टाळणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
85 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स
पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने 30 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कांगारुंना दणका दिला. पाकिस्तानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने झटके दिले. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 85 रॅन्सच्या मोबदल्यात 8 झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 30-0 वरुन 8 आऊट 115 अशी स्थिती झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं 120 रन्समध्येच पॅकअप होईल, असं चित्र होतं.
नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी
मात्र त्यानतंर बेथ मुनी हीला अलाना किंग हीने चांगली साथ दिली. या जोडीने पाकिस्तानला चांगलंच रडवलं. या जोडीने नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या जोडीच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला बूस्टर मिळाला.
मूनी-अलाना किंग या दोघींनी नवव्या विकेटसाठी
106 रन्सची पार्टनरशीप केली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला डावातील शेवटच्या चेंडूवर नववा झटका दिला. पाकिस्ताने यासह ही जोडी फोडली. बेथ मूनी हीने 114 बॉलमध्ये 95.61 च्या स्ट्राईक रेटने 109 रन्स केल्या. बेथने या खेळीत 11 चौकार लगावले. तर अलाना किंग हीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. अलानाने 49 बॉलमध्ये नॉट आऊट 51 रन्स केल्या. अलानाने या खेळीत 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.
बेथ मूनी-अलाना किंग जोडीची निर्णायक भागीदारी
6️⃣6️⃣1️⃣4️⃣4️⃣❌
Watch the enthralling final over of Australia’s #CWC25 innings against Pakistan 🎥👇#AUSvPAKhttps://t.co/0dN9B3VlY3
— ICC (@ICC) October 8, 2025
पाकिस्तानची बॉलिंग
पाकिस्तानकडून एकूण 5 जणींनी बॉलिंग केली. या पाचही जणींनी विकेट मिळवली. नश्रा संधू हीने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. नश्रा संधूने 3 विकेट्स मिळवल्या. कॅप्टन फातिमा सना आणि रमीन शमीम या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर डायना बेग आणि सादिया इक्बाल या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
