10 फेब्रुवारीपासून सुरु होणार Ranji Trophy, स्पर्धेचं शेड्यूल आणि वेळापत्रक झालं जाहीर

कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे.

10 फेब्रुवारीपासून सुरु होणार Ranji Trophy, स्पर्धेचं शेड्यूल आणि वेळापत्रक झालं जाहीर
रणजी करंडक स्पर्धेची (Ranji Trophy 2022) साखळी फेरी 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयला रणजी स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आधी 13 जानेवारीला ही स्पर्धा होणार होती. (PC-PTI)
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:47 PM

मुंबई: कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून रणजीचा मोसम सुरु होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) सर्व राज्य क्रिकेट संघांना याची माहिती दिली आहे. आयपीएलच्या आधी आणि नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये रणजी स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. पहिल्या टप्प्यात ग्रुप स्टेजचे सामने खेळले जातील. 30 मे पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नॉकआऊटचे सामने होतील. बोर्डाने राज्यांना स्पर्धेचा फॉर्मेट आणि स्थळांबाबतही माहिती दिली आहे. रणजी करंडक स्पर्धा यावर्षी 13 जानेवारीला सुरु होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या लाटेमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

2021 मध्ये कोरोना व्हायरसमुळे रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नव्हती. स्पर्धेच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी स्पर्धा आयोजित झाली नव्हती. यावर्षी सुद्धा कोरोनामुळे रणजी स्पर्धेबद्दल साशंकता होती. पण बोर्डाने आता दोन टप्प्प्यांमध्ये रणजी स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. रणजीमधून देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मिळाले आहेत. रणजी स्पर्धा हा भारतीय क्रिकेटचा पाया आहे. त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची आहे. टीम इंडियामध्ये निवडीच्यावेळी रणजीमधली खेळाडूची कामगिरी लक्षात घेतली जाते.

बीसीसीआयने राज्यांना जे शड्युल सांगितलय, त्यानुसार पहिल्या स्टेजची सुरुवात 10 फेब्रुवारीला होणार असून 15 मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये ग्रुप राऊंडचे सामने होणार आहेत. यात 34 दिवसात 57 सामने होतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचा 15 वा सीजन सुरु होणार आहे. मे पर्यंत हा सीजन चालेल. त्यानंतर दुसरा टप्पा होईल. 30 मे ते 26 जून पर्यंत क्वार्टर फायनलचे सामने होतील. 62 दिवसात एकूण 64 सामने होणार आहेत.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.