AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : तणावानंतर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 5 सामने रद्द? बीसीसीआयच्या निर्णयाकडे लक्ष

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी केली आहे. त्याचा परिणाम हा क्रिकेटवरही झालाय. अशात आता बीसीसीआय भारत-पाकिस्तान यांच्यातील एकूण 5 सामन्यांबाबत बीसीसीआय काय निर्णय घेतं? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

IND vs PAK : तणावानंतर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 5 सामने रद्द? बीसीसीआयच्या निर्णयाकडे लक्ष
India vs PakistanImage Credit source: PTI
| Updated on: May 09, 2025 | 8:05 PM
Share

भारताने काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’मधून घेतला. भारताच्या या कारवाईमुळे बावचाळलेल्या पाकिस्तानचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा नापाक प्रयत्न हाणून पाडला. भारतीय सैन्याने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त केली. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याने भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. या दोन्ही देशातील तणावाचा परिणाम क्रिकेटवर पाहायला मिळाला आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पाहून आयपीएल 2025 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 5 सामने नियोजित आहेत. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यांबाबत काय निर्णय घेणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

भारत-पाकिस्तान 5 सामने रद्द होणार?

यंदा आशिया कप 2025 स्पर्धा (Mens Asia Cup 2025) खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतही टीम इंडिया-पाकिस्तान सामना होणार होता. या स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्यात येत होतं. दोन्ही संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे दोन्ही संघात पुढील फेरीत आणखी एक सामना होण्याची शक्यता असते. त्यानुसार यंदाही आशिया कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 2 वेळा सामना होण्याची शक्यता होती. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप स्पर्धेचं आयोजन होणार की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

तसेच आगामी वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडे आहे. ही स्पर्धा रॉबिन राउंड फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. अर्थात प्रत्येक संघ स्पर्धेतील इतर संघांविरुद्ध किमान 1 सामना खेळणार. त्यानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार हे स्पष्ट आहे. मात्र हा सामनाही रद्द होऊ शकतो.

तसेच 2026 मध्ये होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीत 2 शेजाऱ्यांमध्ये किमान 1 सामना होतोच. तसेच 2026 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाकिस्तान असा 1 सामना होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यांबाबत काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.