CSK vs DC IPL 2021 | गुरु धोनी शिष्य रिषभ पंत आमनेसामने, स्टंपमागील कॉमेंट्री ऐकायला मजा येणार, रवी शास्त्रीचं हटके ट्विट

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (mahendra singh dhoni) आणि रिषभ पंत (rishabh pant) ही गुरु शिष्याची जोडी आमनेसामने आहे. याबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ट्विट केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:06 PM, 10 Apr 2021
CSK vs DC IPL 2021 | गुरु धोनी शिष्य रिषभ पंत आमनेसामने, स्टंपमागील कॉमेंट्री ऐकायला मजा येणार, रवी शास्त्रीचं हटके ट्विट
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (mahendra singh dhoni) आणि रिषभ पंत (rishabh pant) ही गुरु शिष्याची जोडी आमनेसामने आहे. याबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ट्विट केलं आहे.

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसरा सामना आज (10 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) विरुद्ध चेन्नईचा अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. धोनी आणि पंत या गुरु शिष्यांमध्ये हा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यासह या गुरु शिष्याच्या जोडीवरही सर्वांचच लक्ष असणार आहे. दरम्यान या जोडीबाबत टीम इंडियाचे मु्ख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी हटके ट्विट केलं आहे. (chennai super kings vs delhi capitals ipl 2021 ravi shastri tweet about mahendra singh dhoni and rishabh pant)

शास्त्री काय म्हणाले?

गुरु विरुद्ध शिष्य. फार मजा येणार. स्टंप माईकवरील कॉमेंट्री नक्की ऐका, असं ट्विट शास्त्री यांनी केलं आहे. धोनी आणि पंत हे दोन्ही आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी विकेटकीपिंग करतात. या दोन्ही यष्टीरक्षकांनी आतापर्यंत क्रिकेट रसिकाचं आणि सहकाऱ्यांच सामन्यादरम्यान स्टंपमागून मनोरंजन केलं आहे. धोनी आणि पंत हे नेहमीच गोलंदाजाला सल्ला आणि मार्गदर्शन देत असतात. त्यांचा हा आवाज स्टंप माईकद्वारे ऐकायला येतो. त्यामुळे या दोघांचा स्टंपमागील अंदाज प्रत्येक क्रिकेट समर्थकाच्या पसंतीस पडला आहे. पंतने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत स्टंपमागून जोरदार बॅटिंग केली होती.

दोघेही चपळ विकेटकीपर

धोनी आणि पंत हो दोघेही चपळ विकेटकीपर आहेत. दोघेही अचूक निर्णय घेतात. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना या दोघांची मजेशीर कमेंट्री अनुभवता येणार आहे.

पंतची पहिली प्रतिक्रिया

श्रेयस अय्यर दिल्लीचा नियमित कर्णधार आहे. मात्र तो दुखापतग्रस्त आहे. यामुळे कर्णधारपदाची धुरा रिषभला देण्यात आली आहे. “धोनीसोबत कर्णधार म्हणून टॉससाठी मैदानात जाणं हे माझ्यासाठी विशेष असणार” अशी प्रतिक्रिया पंतने दिली होती. मी धोनीकडून खूप काही शिकलो आहे. धोनीमुळे मला अनुभव मिळाला आहे. या अनुभवाचा या सामन्यात फायदा होईल आणि आम्ही जिंकू”, अशा आशावाद पंतने व्यक्त केला. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, याबाबत सर्वच क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

संबंधित बातम्या :

CSK vs DC IPL 2021 | गुरु शिष्याची जोडी आमनेसामने, दिल्ली विजयी सलामी करणार की अनुभवी चेन्नई जिंकणार?

IPL 2021 DC vs CSK Live Streamimg : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

(chennai super kings vs delhi capitals ipl 2021 ravi shastri tweet about mahendra singh dhoni and rishabh pant)