AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?

Chennai Super Kings vs Mumbai Indians : नमन धीर याने केलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईला 150 पार मजल मारता आली. आता चेन्नईला विजयासाठी 8 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?
Naman Dhir CSK vs MIImage Credit source: Mipaltan x account
| Updated on: May 02, 2026 | 10:29 PM
Share

मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) एमए चिदंबरम स्टेडिममध्ये 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईसाठी नमन धीर याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र नमन धीर व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. काही फलंदाजांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र त्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे गोलंदाजांना बचाव करण्यासाठी फक्त 159 धावाच मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचे गोलंदाज या धावांचा बचाव करताना कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या डावात काय झालं?

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नमन धीर याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरवला. मुंबईने विल जॅक्स याच्या रुपात पहिली विकेट गमावली. विलने निराशा केली. विलने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

नमन धीर-रायनची फटकेबाजी

मुंबईने 1 धावेवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी जबरदस्त फटकेबाजी केली. त्यामुळे मुंबई मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. मात्र तितक्यातच रायन रिकेल्टन आऊट झाला. नूरने रायनला 37 रन्सवर आऊट झाला. रायन आणि नमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली.

सूर्यकुमार यादव याला आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र सूर्या फार वेळ मैदानात टिकू शकला नाही. सूर्याने 21 धावा केल्या. तिलक वर्मा 5 धावा करुन माघारी परतला. मात्र नमन मैदानात असल्याने पलटणला धीर होता. मात्र नमनला अर्धशतकानंतर आणखी धावा जोडता आल्या नाहीत. नमनने 37 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 57 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड

कॅप्टन हार्दिकला 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. हार्दिकने 23 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. रॉबिन मिंझ 5 धावांवर बाद झाला. तर क्रिष भगत आणि ट्रेंट बोल्ट नाबाद परतले. क्रिषने 3 आणि ट्रेंटने 7 धावा केल्या. चेन्नईसाठी अंशुल कंबोज याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नूर अहमद याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रामकृष्ण घोष आणि जेमी ओव्हरटन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा