AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs SRH IPL 2023 Highlight :हैदराबादनं दिल्लीला पाजलं पराभवाचं पाणी, 9 धावांनी केला पराभव

| Updated on: Apr 29, 2023 | 11:12 PM
Share

DC vs SRH IPL 2023 Highlight : आयपीएल 2023 स्पर्धेतील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 9 धावांनी विजय मिळवला

DC vs SRH IPL 2023 Highlight :हैदराबादनं दिल्लीला पाजलं पराभवाचं पाणी, 9 धावांनी केला पराभव
DC vs SRH IPL 2023 Score Live : दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबादमध्ये अस्तित्वाची लढाई, कोण मारणार बाजी?

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 40 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. पण दिल्लीचं संघ 6 गडी गमवून 188 धावा करू शकला. दिल्लीचा धावांनी पराभव झाला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर हैदराबादला अजूनही स्पर्धेत कमबॅक करण्याची संधी आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Apr 2023 11:11 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : हैदराबादनं दिल्लीला केलं पराभूत

    हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दिल्लीचं संघ 6 गडी गमवून 188 धावा करू शकला. दिल्लीचा धावांनी पराभव झाला.

  • 29 Apr 2023 11:10 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्लीचा डाव

    हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव अडखळला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिशेल मार्शनं डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 112 धावांची भागीदारी केली. फिल सॉल्टने 35 चेंडूत 59 धावा, तर मिशेल मार्शने 39 चेंडूत 63 धावा केल्या. फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर मनिष पांडे आल्या पावली परत गेला. त्याने 3 चेंडूत अवघी एक धाव केली. त्यानंतर आक्रमक खेळी करणाऱ्या मिशेल मार्शला अकिल होसैननं तंबूचा रस्ता दाखवला. प्रियम गार्गही काही खास करू शकला नाही त्याने 9 चेंडूत 12 धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेला सरफराज खानही 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.

  • 29 Apr 2023 10:54 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्लीचा सहावा गडी बाद

    सरफराज खान 9 गडी बाद

  • 29 Apr 2023 10:53 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : प्रियम गार्गच्या रुपाने पाचवा धक्का

  • 29 Apr 2023 10:34 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मिशेल मार्शच्या रुपाने चौथा धक्का

  • 29 Apr 2023 10:30 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्लीला मनिष पांडेच्या रुपाने तिसरा धक्का

  • 29 Apr 2023 10:23 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : फिल सॉल्ट 59 धावा करून बाद, हैदराबादला दुसरा धक्का

  • 29 Apr 2023 10:19 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मिशेल मार्शचं आक्रमक अर्धशतक

  • 29 Apr 2023 10:15 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : फिलीप सॉल्टचं दमदार अर्धशतक

  • 29 Apr 2023 10:00 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मिशेल मार्शने ठोकले सलग दोन षटकार

  • 29 Apr 2023 09:58 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या 1 बाद 57 धावा

  • 29 Apr 2023 09:37 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, डेविड वॉर्नर बाद

  • 29 Apr 2023 09:13 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : हैदराबादचा डाव

    हैदराबादनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मासोबत आघाडीला आलेल्या मयंक अग्रवालने काही खास केलं नाही. 6 चेंडूत 5 धावा करून तंबूत परतला. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने त्याचा झेल घेतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही झटपट बाद झाला अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला. पण एका बाजूने अभिषेक शर्मा खिंड लढवत होता. कर्णधार एडन मारकमही 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हॅरी ब्रूक आपलं खातंही खोलू शकला नाही.

    अभिषेक शर्माने तडाखेबंद फलंदाजी करत 36 चेंडूत 67 धावा केल्या. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारायच्या नादात बाद झाला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला. अब्दुल समद आणि हेनरिच क्लासेन या जोडीने संघाचा डाव सावरला. मात्र 21 चेंडूत 28 धावा करून समद बाद झाला. दुसरीकडे क्लासेनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याला अकिल होसेनची साथ मिळाली. क्लासेनने 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

  • 29 Apr 2023 09:01 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : अब्दुल समदच्या रुपाने सहावा धक्का

  • 29 Apr 2023 08:54 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर क्लासनने खेचले दोन उत्तुंग षटकार,

  • 29 Apr 2023 08:34 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : अक्षर पटेलच्या फिरकीची जादू, अभिषेक शर्माला धाडलं तंबूत

  • 29 Apr 2023 08:22 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : हॅरी ब्रूकच्या रुपाने चौथा धक्का

  • 29 Apr 2023 08:20 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : एडन मारकमच्या रुपान तिसरा धक्का

  • 29 Apr 2023 08:07 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : षटकार ठोकत अभिषेक शर्माचं अर्धशतक

    अभिषेक शर्माचं 25 चेंडूत अर्धशतक

  • 29 Apr 2023 08:04 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : अभिषेक शर्माकडून एका षटकात चार चौकार

    पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या 2 बाद 62 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्माने एकाच षटकात चार चौकार ठोकले.

  • 29 Apr 2023 07:57 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : राहुल त्रिपाठीच्या रुपाने हैदराबादला दुसरा धक्का

  • 29 Apr 2023 07:53 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : राहुल त्रिपाठीचा जबरदस्त षटकार

  • 29 Apr 2023 07:46 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मयंक अग्रवालच्या रुपाने पहिला धक्का

  • 29 Apr 2023 07:36 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मयंक अग्रवालने चौकाराने खातं खोललं

  • 29 Apr 2023 07:31 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : अभिषेक शर्माची चौकाराने सुरुवात

    इशांत शर्माच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकले.

  • 29 Apr 2023 07:30 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा जोडी मैदानात

  • 29 Apr 2023 07:10 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार

  • 29 Apr 2023 07:09 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

  • 29 Apr 2023 07:02 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने

    हैदराबादनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 29 Apr 2023 05:36 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

  • 29 Apr 2023 05:34 PM (IST)

    DC vs SRH IPL 2023 Live Update : सनराईजर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

    हैदराबादचा पूर्ण स्क्वॉड : अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील होसैन, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल रशीद, मयंक मार्कण्डेय, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सनवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव आणि नीतीश कुमार रेड्डी.

Published On - Apr 29,2023 5:33 PM

Follow us
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.