AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AUS : ऑस्ट्रेलिया इंग्लंड आमनेसामने! हे 11 खेळाडू ठरू शकतात बेस्ट, जाणून घ्या सर्वकाही

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 36 वा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहेत. हा सामना ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाचा आहे. असं असलं तरी दोन्ही संघातील 11 खेळाडूंवर पॉइंट्स गणित अवलंबून असणार आहे.

ENG vs AUS : ऑस्ट्रेलिया इंग्लंड आमनेसामने! हे 11 खेळाडू ठरू शकतात बेस्ट, जाणून घ्या सर्वकाही
ENG vs AUS : ऑस्ट्रेलिया इंग्लंड सामन्यात हे खेळाडू सोडवतील आर्थिक गणित! जाणून घ्या ड्रीम प्लेयर्स
| Updated on: Nov 03, 2023 | 10:23 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन संघ आमनेसामने येणार आहेत. इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. इंग्लंडने आतापर्यंत 6 सामने खेळले असून फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे पण ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्गात खोडा टाकू शकते. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्धचा सामना काही करून जिंकावा लागणार आहे. कारण एक पराभव उपांत्य फेरीचं गणित बिघडवू शकतं. दोन्ही संघ आतापर्यंत 115 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 87, तर इंग्लंडने 63 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने टाय आणि तीन सामने अनिर्णित ठरले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत. यात सहा वेळा ऑस्ट्रेलियाने, तर 3 वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.

पिच रिपोर्ट आणि खेळाडूंचा फॉर्म

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. या खेळपट्टीवर चेंडू चांगल्याप्रकारे उसळी घेतो. तर फिरकीपटूंना मधल्या षटकांमध्ये मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, डेविड वॉर्नर या स्पर्धेत फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत दोन शतकं ठोकली आहेत. ट्रॅविस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनीही शतक ठोकलं आहे. मिचेल स्टार्कही यालाही सूर गवसला आहे. जोश हेझलवूड, एडम झाम्पा आणि पॅट कमिन्स यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. तर इंग्लंडकडून एकाही खेळाडूने शतक ठोकलेलं नाही.

ड्रीम इलेव्हन 1

  • विकेटकीपर: जोस बटलर
  • फलंदाज: ट्रॅविस हेड (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, जो रूट
  • अष्टपैलू: डेविड विली, मार्कस स्टोयनिस
  • गोलंदाज: एडम जम्पा, आदिल राशीद, ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क (उपकर्णधार)

ड्रीम इलेव्हन 2

  • विकेटकीपर: जोस बटलर
  • फलंदाज: ट्रॅविस हेड (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, जो रूट
  • अष्टपैलू: डेविड विली, मार्कस स्टोइनिस
  • गोलंदाज: एडम जम्पा, आदिल राशीद, ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क (उपकर्णधार)

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, जॉश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेजलवुड.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.