पर्थ कसोटी पराभवानंतर इंग्लंडने संघात उलथापालथ, 3 जणांना स्क्वॉडमधून केलं बाहेर!
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. असं असताना इंग्लंड संघाने तीन खेळाडूंना रिलीज केलं आहे. हे तिन्ही खेळाडू 29 नोव्हेंबरपासून कॅनबेराच्या मनुका ओवलमध्ये अभ्यास सामना खेळतील.

पर्थ कसोटी सामन्यात इंग्लंडचं पारडं जड वाटत होतं. कारण पहिल्या डावात 40 धावांची आघाडी होती. तसेच खेळपट्टी पाहता 204 धावांचं कठीण आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून इंग्लंडचा पराभव केला. या पराभवामुळे इंग्लंड संघावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅकचं आव्हान आहे. असं असताना संघ व्यवस्थापनाने पंतप्रधान इलेव्हनविरुद्ध इंग्लंड लायन्सच्या दोन दिवसीय पिंक बॉल वॉर्मअप सामन्यासाठी तीन खेळाडूंना रिलीज केलं आहे. प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्धच्या दोन दिवसांच्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाने तीन खेळाडूंना रिलीज केले आहे. हे तिन्ही खेळाडू 29 नोव्हेंबरपासून कॅनबेराच्या मनुका ओव्हलमध्ये सराव सामना खेळतील. इंग्लंडने जॅकब बेथेल, मॅथ्यू पॉट्स आणि जोश टंग या तीन खेळाडूंना रिलीज केलं आहे. हे तिन्ही खेळाडू पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या 12 खेळाडूंमध्ये नव्हते.
संघ व्यवस्थापनाने निवेदनात स्पष्ट केलं की, ‘लायन्सच्या संघात एशेज संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. मंगळवारी पर्थमधून कॅनबेराला रवाना होतील.’ दुसरीकडे, इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने बेन स्टोक्स आणि संघाला पिंक बॉलसोबत सर्वा करण्याचा सल्ला दिला आहे. वॉनने बीबीसीशी बोलताना सांगितलं की. ‘जर इंग्लंडचा संघ पिंक चेंडूसह सराव करत नाही तर पूर्णपणे हौशीपणाचे ठरेल. फ्लडलाइटखाली दोन दिवसांचा सामना खेळण्याक काय नुकसान आहे? त्यामुळे तुमची तयारी सुधारेल.’ त्याने संघाने या संधीचा फायदा घ्यावा असं म्हंटलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल असेल. हा सामना 4 डिसेंबरपासून खेळला जाणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. हा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जाणार आहे. पर्थमधील अपयशानंतर इंग्लंडसमोर कमबॅकचं आव्हान असेल. हा कसोटी सामना गमावला तर मालिका गमवण्याचं संकट इंग्लंडवर ओढावणार आहे. कारण उर्वरित तीन सामन्यात कमबॅकसाठी धडपड करावी लागेल. त्यामुळे दुसरा कसोटी सामना हा इंग्लंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. आता इंग्लंड कसोटी संघात काय बदल केला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
