IPL मधून माघार घेणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंवर संघ नाराज, BCCI कडे केली तक्रार

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील मँचेस्टर कसोटी (Manchester Test) रद्द होताच इंग्लंडच्या तीन दिग्गज खेळाडूंनी आयपीएलच्या (IPl 2021) दुसऱ्या टप्प्यामधूनही माघार घेतली आहे.

IPL मधून माघार घेणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंवर संघ नाराज, BCCI कडे केली तक्रार
आयपीएल

मुंबई : आयपीएल 2021 चे (IPL 2021) भारतात पार पडलेले पहिले पर्व कोरोनाच्या शिरकावामुळे थांबवण्यात आले होते. आता उर्वरीत सामने 19 सप्टेंबरपासून युएईत (UAE) होणार आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच इंग्लंडच्या तीन दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडच्या खेळांडूनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे आयपीएल संघ नाराज झाले असून त्यांनी या वर्तनाबद्दल बीसीसीआयला तक्रार देखील केली आहे.

शनिवार समोर आलेल्या बातमीनुसार इंग्लंडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स या तिघांनी उर्वरीक आयपीएलमधून माघार घेतली आहे. यातील जॉनी सनरायजर्स हैद्राबाद, वोक्स दिल्ली कॅपिटल्स आणि मलान पंजाब किंग्सकडून खेळतो. दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport.co ला दिलेल्या माहितीत संघ व्यवस्थापन खेळाडूंनी अशा शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघा घेतल्यामुळे त्यांच्यावर नाराज असून त्यामुळेच BCCI ला तक्रार करत पत्र लिहिलं आहे.

आणखी खेळाडूही माघार घेऊ शकतो

आयपीएल 2021 मध्ये भाग घेणारे इंग्लंडचे पाच खेळाडू माघार घेऊ शकतात असले बोलले जात आहे. मोईन अली, जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स आणि सॅम करन हे या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. सध्या यापैकी तिघांनी (बेअरस्टो, वोक्स, मलान) माघार घेतली असल्याचे स्पष्ट आहे. मलान आणि बेअरस्टोने माघार घेतल्याने हैदराबाद आणि पंजाबला मोठा धक्का बसला आहे. विशेषत: हैदराबाद फ्रँचायझीसाठी मोठा धक्का आहे, कारण बेअरस्टोने गेल्या दोन हंगामात संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. हैदराबादने अद्याप बदलीची घोषणा केलेली नाही.

आतापर्यंत ६ इंग्लंडवासियांनी घेतली माघार

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याआधीच इंग्लंडच्या सहा खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. यात शनिवारी माघार घेतलेल्या मलान, जॉनी आणि ख्रिसचा समावेस आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्सचे फलंदाज जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांचाही समावेश आहे. जॉस बटलरच्या पत्नीने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे बटलरने स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्टोक्स त्याच्या मानसिक स्थितीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आर्चरच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर असेल.

इतर बातम्या

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

PHOTO : चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उर्वरीत IPL मध्ये सर्वात घातक?, ‘या’ पाच खेळाडूंनी स्पर्धेआधीच दाखवला जलवा

IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच ‘हा’ फलंदाज मैदानावर उडवतोय धुरळा, 7 षटकार ठोकत संघाला मिळवून दिला विजय

(England players Jonny Bairstow Dawid Malan Chris Woakes pull out of IPL 2021 Ipl teams complaint about them to BCCI)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI