AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND U19 : इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, भारताची बॅटिंग, आयुष-वैभव फटकवणार?

England U19 vs India U19 2nd Youth ODI Toss : आयुष म्हात्रे याच्या नेतृ्त्वात भारतीय अंडर 19 संघाने इंग्लंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्याचं आयोजन नॉर्थम्पटनमध्ये करण्यात आलं आहे.

ENG vs IND U19 : इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, भारताची बॅटिंग, आयुष-वैभव फटकवणार?
England U19 vs India U19 2nd Youth ODI TossImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 30, 2025 | 4:17 PM
Share

वूमन्स, मेन्स आणि अंडर 19 असे भारताचे 3 संघ एकाच वेळेस इंग्लंड दौऱ्यावर आहेत. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघाची इंग्लंड विरुद्ध पराभवाने सुरुवात झाली. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 आणि वूमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडियाने युथ वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात 27 जून रोजी इंग्लंडवर 6 विकेट्सने मात केली. तर त्यानंतर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने पहिल्या टी 20I सामन्यात इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर आज 30 जून रोजी अंडर 19 इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन काउंटी ग्राउंड नॉर्थम्पटन करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. इंग्लंडने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे.

पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

अंडर 19 संघाने सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 175 धावांचं आव्हान भारताने 24 ओव्हरमध्येच पूर्ण केलं होतं. टीम इंडियाने 24 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. भारताला विजयी करण्यात आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या जोडीने प्रमुख भूमिका बजावली होती. वैभवने भारतासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं होतं. वैभवने 19 बॉलमध्ये 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. तर आयुषने 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.

तसेच अभिज्ञान कुंदु आणि राहुल कुमार या दोघांनी कडक खेळी करत भारताला विजयी केलं. अभिज्ञान याने 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 45 रन्स केल्या. तर राहुल कुमार याने नाबाद 17 धावांचं योगदान दिलं.भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा करुन इंग्लंड विरुद्ध सलग दुसरा विजय मिळवावा, अशी आशा चाहत्यांना असणार आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताची बॅटिंग

अंडर 19 टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), राहुल कुमार, कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, मोहम्मद इनान, हेनिल पटेल आणि युधाजित गुहा.

इंग्लंड अंडर 19 इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन डॉकिन्स, आयझॅक मोहम्मद, बेन मेयस, रॉकी फ्लिंटॉफ, थॉमस र्यू (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोसेफ मूर्स, राल्फी अल्बर्ट, जॅक होम, सेबॅस्टियन मॉर्गन, एलेक्स ग्रीन आणि एएम फ्रेंच.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.