AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद कॅनडाकडेही आहे. पहिल्यांदाच कॅनडा यजमानपद भूषवत आहे. असं असताना कॅनडा संघाने पहिल्या सामन्यात ऐतिहासिक नोंद केली आहे. पहिल्यांदाच कॅनडा वर्ल्डकप स्पर्धेत पराभव स्वीकारलेला नाही.

FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, 'सुपर सब' लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास
FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, 'सुपर सब' लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहासImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 13, 2026 | 4:31 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गट गटात कॅनडा आणि बोस्निया-हर्जेगोविना हे संघ आमनेसामने आले होते. या रोमहर्षक सामन्यात कॅनडा संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर हा सामना काही कॅनडाने जिंकला नाही. पण हा सामना न गमावता एक विक्रम नोंदवला आहे. या सामन्यात बोस्नियन संघ आक्रमक आणि वर्चस्वशाली होता. सतत आक्रमण करून कॅनडाला बॅकफूटवर ढकललं होतं. त्यामुळे हा सामना कॅनडा गमवणार अशी स्थिती होती. त्यात एक गोलने आघाडी घेतल्याने कॅनडाच्या गोटात चिंतेचं वातावर होतं. पण अखेर कॅनडाने हा सामना 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. कॅनडाने हा सामना बरोबरीत सोडवून फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यात एक गुण मिळवला आहे. याचं श्रेय कायल लॅरिनला जातं. कारण त्याने फक्त 121 सेकंदात गोल मारून संघाला पराभवापासून वाचवलं.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बोस्नियाच्या जोवो लुकिचने 21 व्या मिनिटाला गोल मारून संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी पहिल्या हाफपर्यंत कायम होती. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये कॅनेडियन संघावर दडपण आलं होतं. दुसऱ्या हाफमध्येही बोस्नियाने कॅनडाला गोलसाठी खूपच झुंजवलं. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी कॅनडाकडून आक्रमक खेळ सुरू झाला होता. पण त्यात त्यांना काही यश मिळत नव्हतं. त्यामुळे पराभवाच्या वेशीवर असातना कॅनेडियन प्रशिक्षकाने एक निर्णय घेतला आणि कॅनडा पराभवापासून वाचली.

कॅनेडियन प्रशिक्षकाने 76व्या मिनिटाला स्ट्राईकर काइल लॅरिनला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. कारण त्याने मैदानात उतरल्यानंतर अवघ्या 121 सेकंदात म्हणजेच 79व्या मिनिटाला अप्रतिम पासचे गोलमध्ये रुपांतरण केलं. लॅरिन कॅनडासाठी सुपर सब ठरला आणि त्याने संघाला पराभवापासून वाचवलं. हा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळालं. कॅनडा संघ वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा भाग घेत आहे. पण 1986 आणि 2022 मध्ये एकही सामना जिंकला आला नव्हता. सहा पैकी सहा सामन्यात पराभव झाला होता. पण यावेळी सामना बरोबरीत सोडवून एक गुण कमावला आहे.

Follow Us
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं भयंकर कांड ! असं फुटलं बिंग
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील विधान भोवलं... डॉ. सेजल पवारवर मोठी कारवाई; थेट...
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
Pune | ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा? पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम, महत्त्वाच्या बैठकीला बड्या नेत्यांची दांडी
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!