शतक लगावत रचला इतिहास, पण 5 महिन्यांमध्येच संपलं करीयर, आता या क्रिकेटपटूला व्हायचंय टीम इंडियाचा फिल्डिंग कोच

सध्या भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे विश्वचषकानंतर पदावरुन पायउतार होणार असल्याने त्याजागी आता नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचं काम सुरु आहे.

1/4
टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अनेक बदल होणार आहेत.  यान्वयेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह इतर कोचिंग स्टाफही बदलणार आहे. दरम्यान फिल्डिंग कोच आर श्रीधर यांच्या जागेसाठीही अनेक निवेदनं येत असून एका अशा माजी  भारतीय क्रिकेटपटूंने अर्ज केला आहे, ज्याच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे. या खेळाडूंच नाव अजय रात्रा (Ajay Ratra) असं असून सर्वात कमी वयात यष्टीरक्षक म्हणून कसोटी शतक लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

2/4
फरीदाबादमध्ये जन्माला आलेल्या 39 वर्षीय रात्राने  6 टेस्ट आणि 12 एकदिवसीय सामने भारताकडून खेळले आहेत. तर प्रथम श्रेणीचे 99 सामने खेळले आहेत. तो भारतासाठी परदेशात कसोटी शतक लगावणारा पहिला विकेटकीपर आहे. तर सर्वात कमी वयात ही कामगिरी केल्याचीही नोंद आहे. 2002 साली वेस्ट इंडिज संघाविरुद्ध रात्राने  शतक लगावलं होतं. पण या कामगिरीनंतर केवळ 3  टेस्ट सामने खेळताच दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला आणि परत संघात पुनरागमन करु शकला नाही. त्यामुळे एप्रिल, 2002 ते सप्टेंबर, 2002 इतकं छोटंसच कसोटी करियर अजयचं राहिलं.

3/4
एकदिवसीय सामन्यांचा विचार करता त्याने भारतासाठी 12 वनडे सामने खेळले. ज्यात एक अर्धशतक लगावलं. पण केवळ 7 महिन्यात त्याचं वनडे करियरही संपलं.

4/4
याशिवाय अजयने स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाकडून 99 प्रथम श्रेणी सामन्यात 4 हजार 29 धावा करत 233 झेल टिपले आहेत. तर 27 स्टंपिंग्स देखील केल्या आहेत. तसेच 89 लिस्ट ए सामन्यात 1 हजार 381  धावा आणि108 जणांना स्टम्पामागून बाद केलं आहे. तर कोच म्हणून दिल्ली कॅपिटल्स संघासोबत काम केलं असून भारतीय महिला संघासमोबतही काम केलं आहे. त्यानंतर अजयने आता भारतीय पुरुष संघाचा फिल्डिंग कोच म्हणून अर्ज दाखल केला असून त्याची निवड होणार का? हे पाहावं लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI