अखेरच्या प्रवासात मिल्खा सिंह यांच्या हाती पत्नीचा फोटो, मन हेलावणारं दृश्य

भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग ( Milkha Singh)यांचे शुक्रवारी (18 जून) वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. त्याआधी 5 दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

अखेरच्या प्रवासात मिल्खा सिंह यांच्या हाती पत्नीचा फोटो, मन हेलावणारं दृश्य
milkha singh last ride
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 12:42 PM

नवी दिल्ली : भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग ( Milkha Singh)यांचे शुक्रवारी (18 जून) वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर (Nirmal Kaur) यांचेही 5 दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर लगेचच मिल्खा यांचेही निधन झाले. शनिवारी मिल्खा यांना पंचतत्त्वात विलीन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचा फोटो होता. दरम्यान मिल्खा यांचा हा अखेरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वचजण या फोटोकडे पाहून भावूक झाले आहेत.

मिल्खा हे भारतीय सेनेतून निवृत्त अधिकारी असल्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंगने त्यांना अग्नी दिला. दरम्यान यावेळी त्यांची पत्नी निर्मलाही त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासात सोबत असावी यासाठी त्यांचा फोटो मिल्खा यांच्यासोबत ठेवण्यात आला होता. (Great Indian Sprinter Milkha Singh Last Ride Towards Cemetery holding his Wife Nirmal Kaurs Photograph in Hand)

सेहवागने ट्विट करत व्यक्त केल्या भावना

मिल्खा सिंग यांच्या शेवटच्या प्रवासात सोबत पत्नीचा फोटो असल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटून वीरेंद्र सेहगवागने देखील हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करत, ‘मिल्खा सिंग यांचे पत्नीच्या निधनानंतर पाच दिवसांतच निधन झाले, त्यांच्या शेवटच्या प्रवासात हातात पत्नीचा फोटो, ज्याच्यासोबत ते जग सोडून जात आहेत. हे दृश्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना खऱ्या प्रेमाची आठवण करु देईल.’

काय आहे मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची प्रेम कहाणी?

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावरच झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्टी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर चांगल्या तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण अॅथलेटिक्सच्या राजाचं मैदानावर हॉलीबॉलच्या राणीवर प्रेम जडलं.

पहिल्याच भेटीत मिल्खा सिंग यांचं मन जिंकलं

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर 1955 रोजी कोलंबोला झाली होती. तेथे एका उद्योगपतीने भारतीय खेळाडूंसाठी डिनर आयोजित केला होता तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिल्याचाही किस्सा सांगितलाय. पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघे पुन्हा भेटले. मात्र, त्यांच्या प्रेमाच्या गाडीने 1960 मध्ये वेग पकडला. तेव्हा दोघांची भेट दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनले होते. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत केलं.

लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरच्यांचा विरोध आणि थेट मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

मिल्खा सिंग यांचं नाव मोठं झालेलं असलं तरी निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शिख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा आला. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

संबंधित बातम्या:

भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या पत्नी कालवश, कोरोना संक्रमनामुळे निधन

RIP Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

(Great Indian Sprinter Milkha Singh Last Ride Towards Cemetery holding his Wife Nirmal Kaurs Photograph in Hand)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.