AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने हातातला सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या एका धावेने पराभव झाला. डेविड मिलरने पाचव्या चेंडूवर एक धाव न घेतल्याने पराभवाचं कारण ठरलं. पण आयपीएलचा एक नियम दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला.

IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं
IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलंImage Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 5:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. खरं त हा सामना दिल्लीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता. शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूत 3 धावा अशी स्थिती आली आणि पाचव्या चेंडूवर डेविड मिलरने फटका मारला. पण धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. पण शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना 1 धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेवर कुलदीप यादव धावचीत झाला. या पराभवासाठी डेविड मिलरला दोषी धरलं जात आहे. पण आयपीएलमधील एक नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरला आहे. माजी क्रिकेटपटूंनी या नियमावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. पण आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने अद्याव यावर निर्णय घेतलेला नाही. हा नियमच दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात अडसर ठरला. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आयपीएलमधील वादग्रस्त नियम

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 10व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नितीश राणाविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. पण नितीश राणा बाद नव्हता आणि चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागला होता. या दरम्यान नितीश राणाने एक धाव घेतली. नितीश राणाने पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली. त्यात नाबाद असल्याचं स्पष्ट झाला. पण त्याने घेतलेली एक धाव ग्राह्य घेतली गेली नाही. कारण पंचांच्या निर्णयानंतर चेंडू डेड होतो आणि त्यानंतर घेतलेली धाव ग्राह्य धरली जात नाही. जर ही धाव दिल्ली कॅपिटल्सला मिळाली असती तर चित्र वेगळं असतं. निदान सामना टाय झाला असता.

काय म्हणाला कर्णधार अक्षर पटेल?

पराभवाचं विश्लेषण करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘अर्थातच ज्या प्रकारे आम्ही खेळत आहोत, मला वाटतं दोन्ही संघांनी खूप चांगला क्रिकेट खेळला. आणि हो, मला वाटतं, अशा प्रकारच्या चुरशीच्या सामन्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बोट ठेवू शकता. त्यामुळे मला वाटतं, हो, आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, चुरशीच्या पाठलागात, चुरशीच्या सामन्यात, तुम्ही अनेक गोष्टींवर बोट ठेवू शकता. पण मला वाटतं की पाठलाग करताना, आम्ही अधिक हुशारीने खेळू शकलो असतो. ज्या महत्त्वाच्या वेळी विकेट्स पडल्या, मला वाटतं जर ते घडलं नसतं, तर आम्ही पाठलाग लवकर पूर्ण करू शकलो असतो.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...