AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI Toss : गुजरात विरुद्धही रोहित शर्मा आऊट, मुंबईकडून दोघांचं पदार्पण, बॅटिंग कुणाची?

Gujarat Titans vs Mumbai Indians Toss and Playing 11 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध नाणेफेकीचा कौल लागला आहे. होम टीम गुजरातने पलटणला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

GT vs MI Toss : गुजरात विरुद्धही रोहित शर्मा आऊट, मुंबईकडून दोघांचं पदार्पण, बॅटिंग कुणाची?
GT vs MI Toss Hardik Pandya and Shubman GillImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 20, 2026 | 7:49 PM
Share

आयपीएल 2026 मधील (IPL 2026) 30 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघ आमनेसामने आहेत. गुजरात टायटन्स शुबमन गिल याच्या नेतृत्वात हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीतील मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील सहावा सामना आहे. उभयसंघातील सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन शुबमन गिल याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

होम टीम गुजरातने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने प्लेइंग ईलेव्हनध्ये एकूण 4  बदल केले  आहेत. शार्दुल ठाकुर, दीपक चहर, रियान रिकेल्टन आणि मयंक रावत या या चौघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यापैकी मुंबईकडून दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. दानेश मालेवार आणि कृष भगत याचा समावेश करण्यात आला आहे. कृषला दुखापतीमुळे बाहेर झालेल्या अथर्व अंकोलेकर याच्या जागी मुंबई संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच मिचेल सँटनर याचा समावेश करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील 2026 पासूनची आकडेवारी

अहमदाबादमध्ये 2026 वर्षांत एकूण 9 पैकी 5 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झालाय. तर 3 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम यशस्वी ठरली आहे.

मुंबई इंडियन्सची अहमदाबादमधील कामगिरी

मुंबई इंडियन्सने अहमदाबादमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. मुंबईने त्यापैकी एकमेव सामना जिंकला आहे. मुंबईचा या मैदानातील एकमेव विजय तोही 2014 साली आला होता. तसेच मुंबईला 6 वेळा पराभूत व्हावं लागलंय.

पलटण गुजरात विरुद्ध अपयशी

तसेच मुंबईची या मैदानातील गुजरात टायन्टस विरुद्धची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. मुंबईला गुजरात विरुद्ध या मैदानातील चारही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबई गुजरात विरुद्ध पहिला आणि नरेंद्र मोदी स्टेडियममधील एकूण दुसरा विजय मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात सहाव्या आणि मुंबई दहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. गुजरातने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला 5 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा आणि अशोक शर्मा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.

Follow Us
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत