GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : आज मॅचच्या सुरुवातीलाच मुंबईसमोर मोठा धोका, हाच अडथळा करावा लागेल पार

GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरातच एक प्लेयर मुंबई इंडियन्सवर भारी पडू शकतो. सामन्याच्या सुरुवातीलाच तो जास्त घातक आहे. मुंबई या धोक्याच आव्हान कसं परतवून लावते, त्यावर बरच काही अवलंबून आहे.

GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : आज मॅचच्या सुरुवातीलाच मुंबईसमोर मोठा धोका, हाच अडथळा करावा लागेल पार
GT vs MI IPL 2023Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:15 AM

चेन्नई : IPL 2023 चा सीजन काही जुने दिग्गज आणि काही युवा खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. चालू सीजनमध्ये एमएस धोनी, विराट कोहली, फाफ डू प्लेसी आणि राशिद खान सारख्या अनुभवी क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरी केली. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सुयश शर्मा आणि आकाश मधवाल सारख्या युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली. या सगळ्या खेळाडूंमध्ये एक दिग्गज सातत्यपूर्ण प्रदर्शन करतोय. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हाच खेळाडू मुंबईसमोर आव्हान निर्माण करु शकतो.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज म्हणजे शुक्रवार 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. पाचवेळच्या मुंबई इंडियन्ससमोर डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्सच आव्हान असेल. हार्दिक पांड्याची गुजरात टीम लीग स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर होती. पण क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभूत केलं. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी त्यांना मुंबईचा अडथळा पार करावा लागेल.

पावरप्लेमध्ये मुंबईसमोर मोठं आव्हान

मागच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सला सूर गवसला आहे. त्यामुळे गुजरातचा मार्ग सोपा नसेल. मुंबईला रोखण्यात गुजरातचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी महत्वाची भूमिका बजावू शकतो. या संपूर्ण सीजनमध्ये मोहम्मद शमीने दमदार गोलंदाजी केलीय. पावरप्लेमध्ये विकेट ही शमीची खासियत आहे.

पावरप्लेमध्ये किती विकेट घेतलेत?

मोहम्मद शमी या सीजनमधील गुजरातचा यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 15 सामन्यात सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत. पावरप्लेमध्ये त्याने सर्वात जास्त घातक गोलंदाजी केलीय. शमीने 26 पैकी 15 विकेट पावरप्लेमध्ये घेतले आहेत.

मुंबईला काय काळजी घ्यावी लागेल?

मागच्या सीजनमध्ये मोहम्मद शमाीने पावरप्लेमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. मोहम्मद शमीला विकेट न मिळणं, हे सुद्धा चेन्नई विरुद्ध गुजरातच्या पराभवाच एक कारण होतं. आजच्या सामन्यातही मोहम्मद शमीला पहिल्या 6 ओव्हरमध्ये विकेट मिळणार नाही, याची काळजी मुंबईला घ्यावी लागेल. रोहित शर्माला कोणापासून धोका?

रोहित शर्माला सर्वात जास्त धोका शमीपासूनच आहे. या सीजनमध्ये 10 पेक्षा जास्तवेळा रोहित पावरप्लेमध्ये आऊट झालाय. आयपीएलमध्ये शमीने दोनवेळा रोहितला आऊट केलय. गुजरात आणि शमीला सुरुवातीपासून मुंबईला दबावाखाली ठेवण्याची संधी असेल.

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.