AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता टीमच सोडणार असल्याचं समोर येत आहे. हार्दिक पांड्या इतका कठोर निर्णय घेण्याचं कारणही काही रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे.

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की...
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2026 | 4:48 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने आयपीएल 2026 स्पर्धेच्या मध्यातच हा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्याने आपला निर्णय फ्रेंचायझीला कळवला असून त्याला तेथूनही हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. आता हार्दिक पांड्याने असा निर्णय घेण्याचं कारण काय? ते जाणून घेऊयात..

रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्यानंतर हार्दिक पांड्याने मॅनेजमेंटला सांगितल होतं की आता संघात राहणार नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी मागच्या तीन वर्षात हवी तशी राहिली नाही. मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये जागा मिळवली पण पदरी निराशा पडली. त्यामुळे हार्दिक पांड्याने संघापासून वेगळं होण्याचं निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्या 2021 मध्ये मुंबई सोडून गुजरात टायटन्स संघात गेला होता. त्यानंतर 2024 मध्ये संघात परतल्यानंतर त्याला चाहते आणि खेळाडूंचं हवं तसं सहकार्य मिळालं नसल्याची चर्चाही क्रीडावर्तुळात रंगली आहे.

हार्दिक पांड्याला कोणी त्रास दिला?

सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांवरून चर्चा होतं. त्यात एक कारण वेगळंच आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ खेळाडूवर खूपच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या वरिष्ठ खेळाडूने टी20 वर्ल्डकपदरम्यान 100 टक्के कमिंटमेट मागितली होती. पण मुंबई इंडियन्समध्ये परतला तेव्हा त्या खेळाडूने साथ दिली नाही. त्यामुळे हा वरिष्ठ खेळाडू कोण? या चर्चाही रंगल्या आहेत. पण सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांना तसा काही अर्थही नसतो. आता हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पुढे काय?पांड्या ट्रेड डीलच्या माध्यमातून मुंबई सोडेल की लिलावात उतरेल. हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सचा भाग होऊ शकतो.

Follow Us
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू