PAK vs AUS : भर मैदानात डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी पंचांशी भिडला, म्हणाला ‘मला Cricket Rulebook दाखवा’, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील (PAK vs AUS) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लाहोरमध्ये खेळवला जात आहे. गुरुवारी, सामन्याच्या चौथ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) अचानक मैदानातील पंचाशी भिडला.

PAK vs AUS : भर मैदानात डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी पंचांशी भिडला, म्हणाला 'मला Cricket Rulebook दाखवा', पाहा VIDEO
David Warner vs umpire Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:59 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील (PAK vs AUS) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लाहोरमध्ये खेळवला जात आहे. गुरुवारी, सामन्याच्या चौथ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) अचानक मैदानातील पंचाशी भिडला. वॉर्नर इतका संतापलेला दिसला की त्याने सामना मध्येच थांबवला आणि पंचांना क्रिकेटच्या नियमांचे पुस्तक दाखवण्यास सांगितले. ही घटना ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावातील 21 व्या षटकात घडली. अंपायर अलीम दार आणि एहसान रझा (Ahsan Raza)ओव्हरच्या शेवटच्या चेंडूनंतर स्ट्राइकवर असलेल्या वॉर्नरकडे आले आणि शॉट खेळल्यानंतर त्याला खेळपट्टीच्या डेंजर एरियामध्ये (धोक्याच्या भागात) न येण्याचा इशारा दिला. त्यावर वॉर्नर चिडला आणि त्याने मध्येच खेळ थांबवून पंचांशी वाद घातला.

अंपायरच्या या इशाऱ्याने वॉर्नर संतापला आणि पंचांशी वाद घालू लागला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराचे असे म्हणणे होते की, त्याने काहीही चुकीचे केले नाही. वास्तविक, वॉर्नर त्याच्या क्रिझपासून थोडा मागच्या बाजूला आला होता, त्यामुळे पंचांनी त्याला वॉर्निंग दिली. यादरम्यान वॉर्नर आणि पंच यांच्यातील संपूर्ण वादविवाद स्टंपमध्ये लावलेल्या माइकमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.

वॉर्नरची रुलबुक दाखवण्याची मागणी

स्टम्प माईकद्वारे आपण ऐकू शकतो की, वॉर्नरने क्रीझच्या दिशेने बोट करत पंचांना म्हटले की, “तुम्हाला वाटतंय की, मी माझा शॉट अशा पद्धतीने खेळू?” यावर पंच एहसान रझा म्हणाले, “हो, तुम्हाला बाजूला सरकावं लागेल”, पंचांचं हे म्हणणं ऐकून वॉर्नर संतापला आणि म्हणाला, “मला रुलबुक (क्रिकेटच्या नियमांचं पुस्तक) दाखवा. त्यात हे असं कुठे लिहिलंय ते मला पाहयचं आहे. तुम्ही मला रुलबुक दाखवणार नाही तोवर मी खेळ सुरु करणार नाही.”

मात्र, काही काळ खेळ थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू करण्यात आला. या संपूर्ण चर्चेदरम्यान डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमशी बोलताना दिसला. संपूर्ण प्रकरण सोडवण्यात आल्यानंतर काही वेळात खेळ पुन्हा सुरू झाला.

इतर बातम्या

LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?

MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स

PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.