AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Indies | विंडिजचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट, कॅप्टन संतापला, म्हणाला…

West Indies | आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर 2023 सुपर 6 राउंडमधील तिसऱ्या सामन्यात स्कॉटलँडने विंडिजवर 7 विकेट्सने विजय मिळवला. विंडिजचं या पराभवानंतर वर्ल्ड कपमधील आव्हान सुरु होण्याआधीच संपुष्टात आलं.

West Indies | विंडिजचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट, कॅप्टन संतापला, म्हणाला...
फाईल फोटो
| Updated on: Jul 02, 2023 | 12:38 AM
Share

हरारे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं बिगूल वाजलंय. भारतात 2011 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 25 जून रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यानंतर क्रिकेट चाहत्यांची उत्सूकता आणखी शिगेला पोहचली. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघांनी थेट एन्ट्री घेतली आहे. तर उर्वरित 2 जागांसाठी आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे.  या स्पर्धेत सध्या सुपर 6 राउंड खेळवण्यात येत आहे.

या सुपर 6 मधील तिसऱ्या सामन्यात 1 जुलै रोजी स्कॉटलँड विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना रंगला.  विंडिजसाठी हा ‘करो या मरो’  असा सामना होता.  झिंबाब्वे आणि त्यानंतर नेदरलँड असे सलग 2 सामने गमावल्यानंतर विंडिजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा होता. मात्र विंडिजला स्कॉटलँडकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. विंडिजचं या पराभवासह वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे विंडिज वर्ल्ड कप स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सहभागी होणार नाही.

विंडिज टीमने 1975 आणि 1979 साली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय.  विंडिजने 2 वेळा टी 20 वर्ल्ड कपही जिंकलाय.  एकूण 4 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पात्रता फेरीआधीच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावते हे क्रिकेट चाहत्यांनाही न पटणारं आहे. मात्र तीच खरी परिस्थिती आहे.

शाई होप याच्या नेतृत्वात विंडिजने स्कॉटलँडला विजयसाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. स्कॉटलँडने हे आव्हान 43.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पराभवानंतर विंडिजचा कर्णधार शाई होप याने प्रतिक्रिया दिली आहे.

शाई होप काय म्हणाला?

“सामना आव्हानात्मक होणार असल्याची आम्हाला कल्पना होती. अशा सामन्यांमध्ये टॉस फार निर्णायक ठरतो. या मैदानात टॉस जिंकणारी टीम पहिले फिल्डिंगबाबत विचार करते. आम्ही निराशाजनक फिल्डिंग केली. सामन्यात कॅच ड्रॉप आणि मिसफिल्डिंग होणं स्वाभाविक आहे. मात्र असं व्हायला नको”, असं शाई होप म्हणाला.

“आम्ही कोणत्याही सामन्यात 100 टक्के प्रयत्न केले नाहीत. आमचे प्रयत्न अपुरे पडले. आम्हाला आणखी जोर लावण्याची गरज होती. आम्ही अशा स्पर्धेत सरावाविना खेळण्याचा विचारही करु शकत नाहीत. आमचे आणखी 2 सामने बाकी आहेत. या 2 सामन्यांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करु. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना खेळात फक्त सातत्य आणण्याची गरज आहे”, असंही शाई होप याने नमूद केलं.

विंडिज प्लेइंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन, काइल मेयर्स, केविन सिंक्लेअर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.

स्कॉटलँड प्लेइंग इलेव्हन | रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), ख्रिस्तोफर मॅकब्राइड, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, टॉमस मॅकिन्टोश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ आणि ख्रिस सोल.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.