SA vs NED |44 धावा 4 विकेट्स, माजी खेळाडूकडून करेक्ट कार्यक्रम, नेदरलँड्सच्या बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकेची हवा टाईट
World Cup 2023, SA vs NED | अफगाणिस्ताननंतर नेदरलँड्स क्रिकेट टीम यंदाच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसरा उलटफेर करण्याच्या तयारीत आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला झटपट 4 झटके देत बॅकफुटवर ढकललंय.

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 2 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची नेदरलँड्ससमोर हवा टाईट झाली आहे. नेदरलँड्स विरुद्ध 246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची नाजूत स्थिती झाली आहे. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 44 धावांवर 4 झटके देत जोरदार सुरुवात केली आहे. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक, कॅप्टन टेम्बा बावुमा, एडन मारक्रम आणि रसी वन डेर डुसेन या चौकडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे 4 पैकी दोघांचा काटा हा दक्षिण आफ्रिकेच्याच माजी खेळाडूंना काढला.
दक्षिण आफ्रिकने 246 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. टेम्बा बावुमा आणि क्विंटन डी कॉक ही सलामी जोडी मैदानात आली. क्विंटन डी कॉक तिसऱ्या सामन्यात वर्ल्ड कपमध्ये शतकी हॅटट्रिक करण्याच्या तयारीने मैदानात आला. सलामी जोडीने 36 धावांची सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर कॉलिन अकरमन याने नेदरलँड्सला ब्रेक थ्रू मिळवून देत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला. एकरमनने क्विंटन डी कॉक याला 20 रन्सवर कॅच आऊट केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरची घसरगुंडी झाली.
दक्षिण आफ्रिकेचा माजी आणि आता नेदरलँड्सकडून खेळणाऱ्या रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने कमाल केली. रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका दिला. मर्वेने कॅप्टन टेम्बाची शिकार केली. मर्वेने टेम्बाला 16 धावांवर बोल्ड केलं. पॉल व्हॅन मीकरेन याने एडन मारक्रम याला 1 रनवर दांडी गूल केली. तर त्यानंतर रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने रॅसी व्हॅन डर ड्युसेन याला आर्यन दत्त याच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट करत दुसरी विकेट घेतली. त्यामुळे आफ्रिकेची 4 बाद 44 अशी स्थिती झाली.
रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याच्याकडून करेक्टर कार्यक्रम
🚨 ANOTHER WICKET🚨
TEMBA BAVUMA HAS BEEN BOWLED!! ☄️ 16(31)
SA is 39/2#SAvNED #SAvsNED #CWC23 #INDvsBANpic.twitter.com/BK65qLfPCs
— BatBallBanter 🏏 (@batballbanters) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
