IND vs SL : अरेरे! मनिष पांडे विचित्ररित्या रनआऊट, पाहा व्हिडीओ

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात दीपक चहरच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने विजय मिळवला. पण भारताचा फलंदाज मनिष जो चांगल्या लयीत दिसत होता त्यानेही सामना जिंकवून दिला असता. जर तो असा विचित्ररित्या बाद झाला नसता.

IND vs SL : अरेरे! मनिष पांडे विचित्ररित्या रनआऊट, पाहा व्हिडीओ
मनिष पांडे
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:56 PM

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 3 विकेट्स राखून श्रीलंका संघावर अप्रतिम विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला दिपक चहर (Deepka Chahar) त्याने गोलंदाजीत 2 विकेट घेतल्या तर फलंदाजी करताना नाबाद 69 धावा ठोकत भारताला विजय मिळवून दिला. पण याच सामन्यात अत्यंत कठीण परिस्थित भारताचा डाव सावरणाऱ्या मनिष पांडेची जास्त चर्चा झाली नाही. पण तो दुर्दैवीरित्या रनआऊट झाला त्याचा व्हिडीओ मात्र सर्वत्रच व्हायरल होत आहे.

सामन्यात 276 सारखे मोठे लक्ष्य समोर असताना अवघ्या 39 धावांवर भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले. त्यावेळी मनिष फलंदाजीला आला. कर्णधार शिखर सोबत संयमी खेळी करत असतानाच शिखरही बाद झाला. मात्र अशा कठीण परिस्थितही मनिषने आपली संयमी खेळी कायम ठेवली. पण सूर्यकुमारने खेचलेला एक सरळ फटका हलकासा गोलंदाज शनाकाच्या हाताला लागून नॉन-स्ट्राईकवरील स्टम्पसना लागला. नेमकं त्याचवेळी मनिषही थोडा पुढे आला असल्याने दुर्देवाने रनआऊट झाला आणि त्याची 37 धावांची संयमी खेळी तिथेच संपुष्टात आली.

सामन्याचा लेखाजोखा

श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली.

सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.

हे ही वाचा :

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

दीपक चहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

(In india vs Sri lanka seconf ODI Manish Pandey Runout video went viral)

Non Stop LIVE Update
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.