AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus: कोच गंभीर ओपनिंगला हिटमॅनच्या जागी या खेळाडूला खेळवणार? रोहितला दुसऱ्या वनडेत शेवटची संधी?

Rohit Sharma IND vs AUS 2nd Odi : रोहित शर्मा याच्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणारा दुसरा एकदिवसीय सामना निर्णायक असा ठरणार आहे. बॅकअप ओपनर असून यशस्वी जैस्वाल याने सराव केल्याने आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Ind vs Aus: कोच गंभीर ओपनिंगला हिटमॅनच्या जागी या खेळाडूला खेळवणार? रोहितला दुसऱ्या वनडेत शेवटची संधी?
Rohit Sharma IND vs AUSImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Oct 21, 2025 | 9:00 PM
Share

टीम इंडिया पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. पर्थमध्ये झालेल्या सामन्यात भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तसेच पावसामुळे पहिल्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान सातत्याने खेळ होऊ शकला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 26 ओव्हरमध्ये 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने या पहिल्या सामन्यात टीम इंडियात कमबॅक केलं. या जोडीकडून भारताला मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दोघांनीही घोर निराशा केली. रोहित 8 धावांवर आऊट झाला. विराटला भोपळाही फोडता आला नाही.

रोहित आणि विराटने पहिल्या सामन्यातील अपयशानंतर दुसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव केला. एडलेडमध्ये मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाच्या अनुभवी जोडीने इतर सहकाऱ्यांसह सराव केला. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही सराव केला. मात्र यशस्वीला या मालिकेत बॅकअप ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वी बॅकअप असूनही इतका वेळ सराव का करत होता? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच यशस्वीला संधी दिली जाऊ शकते. त्या अनुषंगाने यशस्वीने सराव केला असावा, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रोहितसाठी धोक्याची घंटा

आता यशस्वीने केलेला सराव रोहितसाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. रोहितला पहिल्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे जर रोहित दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही अपयशी ठरला तर त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यात यशस्वीला संधी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. यशस्वीला केवळ एकमेव एकदिवसीय सामन्याचा अनुभव आहे. त्यामुळे रोहितला वगळून यशस्वीला संधी मिळण्याची संधी फार कमी आहे.

तसेच रोहित कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी ओपनर म्हणून यशस्वीच प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर त्या अनुषंगाने आतापासूनच यशस्वीकडून तयारी करुन घेतोय का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

हिटमनॅची आकडेवारी

रोहितसाठी चिंताजनक बाब म्हणजे त्याचे एडलेड ओव्हलमधील आकडे काही खास नाही. दुसरा सामना हा या एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे. रोहितने या मैदानात एकूण 6 सामने खेळले आहेत. रोहितने या 6 सामन्यांमध्ये 21.38 च्या सरासरीने आणि 73.18 च्या स्ट्राईक रेटने एकूण 131 धावा केल्या आहेत. रोहितला या मैदानात एकदाही अर्धशतक करता आलेलं नाही. रोहितची या मैदानातील 43 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे रोहित आता 23 ऑक्टोबरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कमबॅक करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.