AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाला हरवत मालिका जिंकली खरी पण, स्मिथसाठी वाईट बातमी

भारतीय संघावर 21 धावांनी मात करत हा सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. स्मिथने आपल्या नेतृत्वाची छाप पाडेलेली दिसून आली. मात्र त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

IND vs AUS : टीम इंडियाला हरवत मालिका जिंकली खरी पण, स्मिथसाठी वाईट बातमी
| Updated on: Mar 22, 2023 | 11:43 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना कांगारूंनी आपल्या नावावर केला. भारतीय संघावर 21 धावांनी मात करत हा सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. स्मिथने आपल्या नेतृत्वाची छाप पाडेलेली दिसून आली. मात्र त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर उर्वरित फलंदाज किमान दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांनी किमान 10-10 धावा केल्या, पण स्टीव्ह स्मिथला 3 चेंडूत खातेही उघडता आलं नाही. हार्दिक पंड्याने त्याला आऊट केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 269 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 248 धावांवरच आटोपला. भारताकडून विराट कोहलीने 54 धावांची अर्धशतकी खेळी मात्र दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. कांगारूंनी 21 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाने 269 धावा केल्या आहेत. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताची बॅटींग- 

भारताची सुरूवात चांगली झाली होती, सलामीवर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी  65 धावांची सलामी दिली होती. रोहित शर्मा 11 धावा करून परतला त्यानंतर लगोलग शुबमनला 37  धावांवर झॅम्पाने पायचीत करत त्यालाही टिकू दिलं नाही. विराट कोहली आणि के. एल. राहुल यांची जोडी जमली होती मात्र मोठा खेळण्याच्या प्रयत्नात तोही 32 धावा करून बाद झाला.

विराट मैदानावर टिकून होता, अक्षर पटेल वरच्या क्रमांकावर खेळायला आला होता. मात्र तो धावबाद झाला त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराटने आपल्या हातात सुत्र घेतलीत. अर्धशतक करून झाल्यावर विराट बाद झाला. सूर्या आला आणि आजही तो पहिल्याच बॉलवर गेला.  हार्दिक आणि जडेजा मैदानात होते मात्र झॅम्पाने दोघांना बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकवला. झॅम्पाने 4 तर अॅश्टन आगर 2, स्टॉइनिस आणि अॅबॉटने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.