AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाला सलग दुसर्‍या विजयासह मालिका विजयाची संधी, इंग्लंड रोखणार?

India vs England 2nd Odi : टीम इंडियाने 6 फेब्रुवारीला सलामीचा सामना जिंकला. त्यामुळे टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे.

IND vs ENG : टीम इंडियाला सलग दुसर्‍या विजयासह मालिका विजयाची संधी, इंग्लंड रोखणार?
jos buttler ind vs eng odi seriesImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 09, 2025 | 7:58 AM
Share

भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट टीमला अद्याप अपेक्षित कामगिरी करता आली नाहीय. इंग्लंडला आधी 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागंल. टीम इंडियाने इंग्लंडवर 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही विजयी घोडदौड सुरुच ठेवली. टीम इंडियाने गुरुवारी 6 फेब्रुवारीला इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडला चितपट करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडसमोर दुहेरी आव्हान

इंग्लंड या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत दुसर्‍या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

टीम इंडियाचा कटकमध्ये दुसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव

इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.