AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण…

भारत आणि इंग्लंड या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडचे फलंदाज टीम इंडियावर भारी पडले. 587 धावांचा डोंगर आणि 5 विकेट झटपट घेऊनही ब्रूक आणि स्मिथ जोडी डोकेदुखी ठरली. या दरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलच्या कपाळावर जोरात चेंडू लागला.

Video : कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण...
कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण...Image Credit source: video grab
| Updated on: Jul 04, 2025 | 6:42 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने जबरदस्त कमबॅक केलं. सहाव्या विकेटसाठी या जोडीने दमदार खेळी केली. 84 धावांवर 5 गडी बाद अशी स्थिती होती. या दोघांनी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे भारताचं फॉलोऑन देण्याचं स्वप्न भंगणार असंच दिसत आहे. दोघांनी शतकी खेळी केल्याने इंग्लंडने डाव सावरला असंच म्हणावं लागेल. खरं तर ब्रूकची विकेट मिळायला हवी होती. पण त्याचा झेल सुटल्याने त्याने शतक ठोकलं. जडेजाच्या गोलंदाजीवर गिलने विकेट घेण्याची संधी गमावली. रवींद्र जडेजाने डावातील 37वे षटक टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकने कट शॉट खेळला. पण चेंडू बॅटच्या काठावर आदळला आणि स्लिपवर उभ्या असलेल्या गिलकडे गेला. पण चेंडू इतक्या वेगाने गिलकडे आला की त्याचा अंदाज लावता आला नाही. गिलने त्याच्या डोक्याकडे येणारा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आलं. गिलच्या हातातून निसटलेला चेंडू थेट त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागला.

चेंडू डोक्यावर जोरात आदळल्याने शुबमन गिलला वेदना होऊ लागल्या. सुदैवाने, चेंडू गिलच्या डाव्या डोळ्याच्या अगदी एक किंवा दीड इंच वर लागला. जर हा चेंडू गिलच्या डोळ्याला लागला असता तर परिस्थिती काही वेगळी असती. गिलची कारकीर्द धोक्यात आली असती. गिलला दुखापत होताच संघाचे फिजिओ ताबडतोब मैदानात आले आणि गिलची तपासणी केली. पण व्यवस्थित असल्याचं कळताच सर्वांना सुटकेचा निश्वास सोडला.

हॅरी ब्रूकचा झेल सोडला तेव्हा तो 63 धावांवर खेळत होता. मात्र त्याने या संधीचं सोन केलं आणि आक्रमक खेळ सुरुच ठेवला. खऱ्या अर्थाने भारताच्या गोलंदाजीची पिसं निघताना दिसत आहे. भारताकडे इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं कोणतंच उत्तर दिसत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत सहज जिंकेल असं वाटणारा सामना आता बरोबरीवर आला आहे. भारताने 587 धावा केल्या म्हणून ठीक आहे. अन्यथा इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणं खूपच कठीण झालं असतं.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.