AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडला चारीमुंड्या चीत केल्यावर टीम इंडियाला मिळालं खास ‘गिफ्ट’, खेळाडूंची चंगळ

IND vs ENG 4th test : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असताना टीमसाठी गुड न्यूज आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने मालिका खिशात घातली आहे. अशातच टीमला एक गिफ्ट मिळालं आहे.

IND vs ENG : इंग्लंडला चारीमुंड्या चीत केल्यावर टीम इंडियाला मिळालं खास 'गिफ्ट', खेळाडूंची चंगळ
| Updated on: Feb 27, 2024 | 9:33 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये पार पडलेल्या चौथ्या कसोटी मालिकेतही रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली इंग्लिश संघाचा पराभव करत मालिका खिशात घातली. टीम इंडियाने मालिका जिंकत मोठा पराक्रम आहे. सलग १७ मालिकांमध्ये घरच्या मैदानवर विजयश्री कायम ठेवला आहे. ३-१ ने मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडियाला गिफ्ट मिळालं आहे.

नेमकं काय आहे ते गिफ्ट?

चौथा कसोटी सामना एक दिवस आधी म्हणजेच चौथ्याच दिवशी जिंकला. आता पुढील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना  ७ मार्च ते ११ मार्च यादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला सुट्टी देण्याती आल्याची माहिती समजात आहे. टीम इंडियाचे खेळाडू आपल्या घरी जावू शकणार आहेत. फक्त टीम इंडियालाच नाहीतर इंग्लंडच्या खेळाडूंनाही सुट्टी मिळाल्याची माहिती समजत आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना पाच दिवस ही सुट्टी राहणार आहे.

पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाकडे तयारीसाठी चार दिवस असणार आहेत. या सामन्याआधी खेळाडू आपल्या घरी जावून येऊ शकतात. टीम इंडियाने मोठं शिखर सर केलं आहे असं म्हणावं लागेल. इंग्लंड संघ पाकिस्तामध्ये पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा त्यांनी यजमान पाकिस्तान संघाला व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे यंदा भारतामध्ये आल्यावर आपल्या बेजबॉल रणनितीने धक्कादायक निकाल नोंदवतात की काय अशी भीती होती.

दरम्यान, टीम इंडियाने बेजबॉलमधील हवा सोडलेली संपूर्ण क्रिकेट जगताने पाहिली. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली, के.एल. राहुल, जडेजा हे खेळाडू सर्व सामने खेळले नाहीत. तरीसुद्धा टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल,  ध्रुव जुरेल आणि आकाशदीप यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आता पाचव्या कसोटीतही विजयी पताका लावण्यासाठी टीम इंडिया आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.