AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, अभिषेक नाही, तर हा खेळाडू ‘हिरो’!

India vs England T20i Series : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये इंग्लंडवर 150 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानेयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.

IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, अभिषेक नाही, तर हा खेळाडू 'हिरो'!
india clinch t20i series by 4 1 against englandImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 03, 2025 | 9:29 AM
Share

कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात अभिषेक शर्मा याने धमाका केला. अभिषेक शर्मा याने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियमध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाच्या फंलदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. इंग्लंडचा 97 धावांवर खुर्दा उडवत टीम इंडियाने 150 धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. अभिषेक शर्मा याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. अभिषेकने 2 विकेट्स घेतल्या. अभिषेकला या ऑलराउंडर कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

अभिषेकने या सामन्यात विक्रमी खेळी केली. अभिषेकने 54 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावा ठोकल्या. अभिषेकच्या खेळीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली, परिणामी मोठ्या फरकाने जिंकता आलं. टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी 2023 साली इंग्लंडवर 168 धावांनी मात केली होती. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा टी 20i विजय आहे.

अभिषेक हा टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला. मात्र टीम इंडियाच्या या मालिका विजयाचा हिरो ठरला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला. वरुणने या मालिकेतील 5 सामन्यांत एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणने या दरम्यान एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. वरुणने घेतलेल्या 14 विकेट्ससाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वरुणची सामेननिहाय कामगिरी

वरुण चक्रवर्ती याने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. राजकटमध्ये झालेल्या तिसर्‍या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. चेन्नईत 2 तर कोलकातामध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

वरुण चक्रवर्ती मॅन ऑफ द सीरिज

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.