AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाला दुसऱ्या वनडेआधी टेन्शन, आकड्यांमुळे शुबमनसेनेच्या डोकेदुखीत वाढ

India vs New Zealand 2nd ODI: टीम इंडियाने 2026 वर्षातील पहिला एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंड विरूद्ध 1-0 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. मात्र या सामन्याआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

IND vs NZ : टीम इंडियाला दुसऱ्या वनडेआधी टेन्शन, आकड्यांमुळे शुबमनसेनेच्या डोकेदुखीत वाढ
Michael Bracewell and Shubman Gill IND vs NZImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 13, 2026 | 6:50 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताने रविवारी 11 जानेवारीला सलामीचा सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. भारताने न्यूझीलंड विरुद्ध 301 धावांचं आव्हान 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्याआधी भारताची आकड्यामुळे चिंता वाढली आहे. भारताची राजकोटमधील वनडे क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी चिंताजनक आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. भारताने शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवलाय. तसेच एकदिवसीय संघात एकसेएक आणि तोडीस तोड खेळाडू आहेत. मात्र राजकोटमधील भारताची आकडेवारी हा चिंतेचा विषय आहे. भारताने या मैदानात किती सामने खेळलेत आणि त्यापैकी किती जिंकलेत? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया, वनडे क्रिकेट आणि राजकोट

भारताचा बुधवारी राजकोटच्या इतिहासातील पाचवा एकदिवसीय सामना (Team India Odi Record at Rajkot) असणार आहे. भारताला याआधी झालेल्या 4 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 2 तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 1-1 एकदिवसीय सामना खेळला आहे. मात्र त्यापैकी फक्त एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय.

भारताची राजकोटमधील कामगिरी कशी

भारताला 2013 साली या मैदानातील आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी 2015 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

शुबमनसेनेच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष

भारताने राजकोटमध्ये आपल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळत विजयाचं खातं उघडलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा या मैदानात 36 धावांनी धुव्वा उडवला. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 2023 मध्ये झालेल्या सामन्यात पलटवार केला. कांगारुंनी 2025 मध्ये हा सामना 66 धावांच्या अंतराने जिंकून 2023 मधील पराभवाची परतफेड केली. त्यामुळे आता टीम इंडिया बुधवारी दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...