Ind vs Nz: शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर शिखर धवन एक मोठी गोष्ट बोलला

Ind vs Nz: झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीजच्याआधी शिखर धवनबरोबर असं घडलं होतं.

Ind vs Nz: शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर शिखर धवन एक मोठी गोष्ट बोलला
Shikhar-Dhawan Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 5:32 PM

ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. ऑकलंड येथे पहिला वनडे सामना खेळला जाईल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे वनडे टीमच नेतृत्व सोपवण्यात आलय. वर्ष 2022 मध्ये शिखर धवन तिसऱ्यांदा टीमच नेतृत्व करणार आहे. आधी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील वनडे सीरीजमध्ये टीमच नेतृत्व केलं.

अखेरच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवलं

धवनने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच नेतृत्व केलं होतं. त्यावेळी मुख्य टीम इंग्लंडमध्ये होती. झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीजसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण अंतिम क्षणी केएल राहुल टीममध्ये आला. तो दुखापतीमधून सावरला होता. त्याला टीम इंडियाच कॅप्टन बनवण्यात आलं.

शिखरला विचारला प्रश्न

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेआधी शिखर धवनला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये शेवटच्या क्षणी कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं, त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या?

तेव्हा मला कल्पना होती की….

“तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी भाग्यवान आहे, मला करिअरच्या या टप्प्यावर टीमच नेतृत्व करण्याची संधी मिळतेय. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. आम्ही युवा टीम बरोबर एक चांगली सीरीज जिंकलीय. झिमाब्वे टूरबद्दल बोलायच झाल्यास, केएल राहुल टीमचा मुख्य उपकर्णधार आहे. जेव्हा तो परत आला, तेव्हा मला कल्पना होती की, त्याला आशिया कपमध्ये खेळायच आहे. आशिया कपच्यावेळी रोहितला दुखापत झाली असती, तर त्याच्याजागी राहुल टीमच नेतृत्व करणार होता” असं शिखर धवन म्हणाला.

जे काही होतं, ते चांगल्यासाठीच

“जे काही होतं, ते चांगल्यासाठीच होतं. मला त्यावेळी दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं. निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटने मला संधी दिली. मला कधी वाईट वाटत नाही” असं धवन म्हणाला.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.