AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा हिशोब, टीम इंडियाकडून अचूक परतफेड

ICC Womens World Cup 2025 Points Table : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने एका विजयासह डबल धमाका केला. भारताने पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाला झटका दिलाय.

IND vs PAK : पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा हिशोब, टीम इंडियाकडून अचूक परतफेड
India Women Cricket TeamImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 06, 2025 | 6:18 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने रविवारी 5 ऑक्टोबरला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत आपल्या मोहिमेतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताचा पाकिस्तानवर 88 धावांनी विजय मिळवला.  भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सलग आणि एकूण 12 वा विजय ठरला. भारताने यासह पाकिस्तान विरुद्धची विजयी घोडदौड सुरु ठेवली. भारताने या विजयासह गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचाही हिशोब केला. भारताने ऑस्ट्रेलियाला पॉइंट्स टेबलमध्ये पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतली. याच ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडला पराभूत करत भारताला मागे टाकलं होतं.

टीम इंडियाने 30 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारताने यासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली होती. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलिया टीमने 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडला 89 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह टीम इंडियाला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं. अशाप्रकारे न्यूझीलंडच्या पराभवामुळे टीम इंडियाला पॉइंट्स टेबलमध्ये फटका बसला होता. मात्र भारताने 5 ऑक्टोबरला पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा हिशोबही केला.

ऑस्ट्रेलियाला पछाडत महिला ब्रिगेडचा धमाका

टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानला पराभूत करत पहिल्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. टीम इंडियाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट जास्त आहे. मात्र टीम इंडिया खात्यात 4 पॉइंट्स असल्याने पहिल्या स्थानी आहे.

टीम इंडियाने या स्पर्धेत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना समसमान 1-1 पॉइंट देण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 3 गुण आहेत. तर भारतीय संघाच्या खात्यात 4 पॉइंट्स आहेत.

कांगारुंना पछाडत टीम इंडिया नंबर 1

वूमन्स टीम इंडिया पहिल्या स्थानी

ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडिया 4 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. टीम इंडियाचा नेट रनरेट हा +1.515 असा आहे. तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.780 असा आहे. त्यानंतर इंग्लंड आणि बांग्लादेश तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी विराजमान आहेत. या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला अद्याप विजयी होता आलेलं नाही.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.