IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला, कॅप्टन बदलला, ऋतुराज गायकवाड याला संधी, पाहा प्लेइंग ईलेव्हन
India vs South Africa 1st Odi Toss and Playing 11 : टीम इंडिया पुन्हा एकदा टॉसबाबत कमनशिबी ठरली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टॉसचा बॉस ठरला आहे.

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर मायदेशात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे रांचीत करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी कॅप्टनसह एकूण दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला
दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. नियमित कर्णधार टेम्बा बुवमा याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे एडन मार्रक्रम याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. या सामन्यात एडनने टॉस जिंकला. एडनने टॉस जिंकत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 300 पार मजल मारणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने टेम्बासह केशव महाराज यालाही विश्रांती दिली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात 4 फिरकीपटूंना प्लेइंग ईलेव्हमध्ये संधी दिली आहे, याबाबतची माहिती कॅप्टन एडन मार्रक्रम याने दिली आहे.
ऋतुराजला संधी, ऋषभला डच्चू
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऋतुराज गायकवाड याला संधी देण्यात आली आहे. ऋतुराजने अवघ्या काही दिवसांआधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 मॅचच्या सीरिजमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. ऋतुराजला त्यानंतर भारतीय संघात संधी देण्यात आली. त्यानंतर आता ऋतुराजचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच विकेटकीपर ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांना डच्चू देण्यात आला आहे.
रोहित-विराटकडून मोठ्या खेळीची आशा
दरम्यान रांचीत टीम इंडियाला पहिल्या डावात बॅटिंगची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
दक्षिण आफ्रिकेचे अंतिम 11 खेळाडू : एडन मार्रक्रम (कर्णधार), रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), मॅथ्यू ब्रेट्झके टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर आणि ओटनील बार्टमन.
