AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारताचा रंगतदार सामन्यात 17 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज अपयशी

India vs South Africa 1st Odi Match Result : टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. भारताने हा सामना 17 धावांनी आपल्या नावावर केला.

IND vs SA : भारताचा रंगतदार सामन्यात 17 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज अपयशी
Team India Virat Kohli CelebrationImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 30, 2025 | 10:42 PM
Share

पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने रांचीत टीम इंडिया विरुद्ध 350 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरपर्यंत जोरदार झुंज दिली. टीम इंडियाने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर 349 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना होता. भारतीय गोलंदाजांनी टॉप ऑर्डरला 11 धावांच्या मोबदल्यात मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे टीम इंडिया सामना जिंकणारच, असं चित्र होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हा सामना जिंकला.

कॉर्बिन बॉश याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. मात्र प्रसिध कृष्णा याने कॉर्बिन बॉश याला आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेचं यासह पॅकअप झालं. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 332 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या त्रुकुटाची जोरदार झुंज

भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसमोर दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झके, मार्को यान्सेन आणि कॉर्बिन बॉश यांनाच सामना करता आला. मॅथ्यूने 72 धावा केल्या. तर यान्सेनने 70 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची आशा कायम राखली. तर कॉर्बिन बॉश याने टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरपर्यंत तंगवलं. बॉशने दक्षिण आफ्रिकेला विजयाजवळ आणून ठेवलं होतं. मात्र प्रसिधने 50 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर बॉशला 67 धावांवर रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने यासह हा सामना आपल्या नावावर केला.

भारताची बॉलिंग

तर टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने दक्षिण आफ्रिकेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंह याने 2 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिधने एकमेव मात्र निर्णायक विकेट घेत भारताला विजयी केलं.

भारताची बॅटिंग

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामी जोडी टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. भारताने 25 धावांवर यशस्वीच्या रुपात पहिली विकेट गमावली. यशस्वी 18 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रोहित आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

रोहित-विराटने दुसर्‍या विकेटसाठी 109 बॉलमध्ये 136 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर रोहित 57 रन्सवर आऊट झाला. ऋतुराज गायकवाड 8 आणि वॉशिंग्टन सुंदर 13 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताची 1 आऊट 161 वरुन 4 बाद 200 अशी स्थिती झाली.

भारताची विजयी सलामी

त्यानंतर केएल राहुल आणि विराटने टीम इंडियाला 276 धावांपर्यंत पोहचवलं. विराटच्या रुपात भारताने पाचवी विकेट गमावली. विराटने 135 धावा केल्या. विराट आऊट झाल्यानंतर केएल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी टीम इंडियाला 341 धावांपर्यंत पोहचवलं. त्यानंतर केएल राहुल 60 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा याने 32 रन्स केल्या. तर अर्शदीप सिंह झिरोवर आऊट झाला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.