IND vs SA: हरमनप्रीत-स्मृती जोडीची शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेला 326 धावांचं आव्हान
WIND vs WSA 2nd Odi: स्मृती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सहज 300 पार मजल मारली.

स्मृती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 325 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्मृती मंधानाने सर्वाधिक 136 धावांची खेळी केली. तर कॅप्टन हरमनने नाबाद 103 धावा केल्या. तर इतर तिघींनी छोटेखानी मात्र उपयुक्त धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला 300 पार सहज पोहचता आलं. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांवर जबाबदारी आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. दोघींनी ठिकठाक सुरुवात केली. मात्र शफाली टीम इंडियाचा स्कोअर 38 असताना 20 धावांवर बाद झाली. त्यानंतर दयालन हेमलथा मैदानात आली. स्मृती आणि दयालन या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. त्यानंतर दयालन 41 बॉलमध्ये 24 धावा करुन माघारी परतली. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती ही 2 बाद 100 अशी झाली.
तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
मात्र त्यानंतर स्मृती आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी टीम इंडियासाठी भक्कम भागीदारी केली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. या दरम्यान स्मृतीने दक्षिण आफ्रिके विरुद्ध सलग दुसरं शतक ठोकलं. तसेच शतकानंतरही तिने दांडपट्टा सुरुच ठेवला. मात्र ती आणखी मोठी खेळी करु शकली नाही. स्मृतीने 136 धावा केल्या. स्मृतीनंतर रिचा घोष मैदानात आली. रिचा आणि हरमनप्रीत कौर ही जोडी नाबाद परतली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 56 धावा जोडल्या.
स्मृती-हरमनप्रीतची शतकी खेळी
Innings Break!
Talk about mighty batting display! 💪 💪
Cracking tons from Captain @ImHarmanpreet & vice-captain @mandhana_smriti! ⚡️ ⚡️#TeamIndia posted 325/3 on the board! 👏 👏
Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/j8UQuA5BhS #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/JnNLcDIEnp
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2024
स्मृतीनंतर हरमनप्रीतने ही शतक ठोकलं. हरमनच्या वनडे कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. हरमनने 88 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 103 रन्स केल्या. तर रिचा घोषने नाबाद 25 धावा केल्या. नॉनकुलुलेको मलाबा हीने 2 विकेट्स घेतल्या. तर मसाबता क्लास हीच्या खात्यात 1 विकेट गेली.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.
दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.
