AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : शुबमन गिल दुसऱ्या कसोटीत खेळणार की भारताचा कॅप्टन बदलणार? मोठी अपडेट समोर

India vs South Africa 2nd Test : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यात कॅप्टन शुबमन गिल याला मानेला दुखापत झालीय. त्यामुळे शुबमन गुवाहाटीत खेळणार की नाही? याबाबत शंका आहे.

IND vs SA : शुबमन गिल दुसऱ्या कसोटीत खेळणार की भारताचा कॅप्टन बदलणार? मोठी अपडेट समोर
Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Nov 18, 2025 | 9:16 PM
Share

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात तब्बल 15 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला. तसेच दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताचा कर्णधार शुबमन गिल याला पहिल्या कसोटीत बॅटिंग दरम्यान मानेला दुखापत झाली. त्यामुळे गिल दुसर्‍या डावात बॅटिंगसाठी आला नाही.

शुबमनला मानेच्या दुखापतीमुळे कोलकातातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुबमनला डिस्चार्जही मिळाला. मात्र दुखापतीमुळे शुबमन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. आता शुबमनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे.

शुबमनला सामन्यादरम्यान दुखापत

शुबमन याला पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास झाला. त्यामुळे शुबमनला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. शुबमन 3 बॉलमध्ये 4 रन्स करुन मैदानाबाहेर गेला.  त्यानंतर शुबमन पहिल्या कसोटीतून अप्रत्यक्ष बाहेरच झाला. मात्र शुबमन आवश्यक उपचारांनंतर आता ठीक आहे. मात्र शुबमन दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? हे अजूनही निश्चित नाही.

शुबमन गिल गुवाहाटीत जाणार, खेळणार की नाही?

क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, शुबमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी गुवाहाटीला जाणार आहे. सूत्रांनुसार, शुबमन 19 नोव्हेंबरला कोलकाताहून गुवाहाटीला रवाना होणार आहे, हे आधीपासूनच ठरलं आहे. आता शुबमन गुवाहाटीला जातोय म्हटल्यावर अनेकांना दुसऱ्या कसोटीत तो खेळणार, असा विश्वास आहे. मात्र शुबमनबाबत दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.  क्रिकबझनुसार,  शुबमन गुवाहाटीतील कसोटी सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार की नाही? हे 21 नोव्हेंबरला निश्चित होणार आहे.

मुंबई दौरा रद्द

सूत्रांनुसार, शुबमन दुखापतीमुळे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी मुंबईला येणार होता. मात्र आता शुबमन येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक शुबमनवर लक्ष ठेवून असणार आहेत.

..तर ऋषभ पंत कॅप्टन

शुबमनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत याने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे शुबमन दुसऱ्या कसोटीत न खेळल्यास पंत नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.