IND vs SA Live Streaming : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, 2 चॅम्पियन खेळाडू आमनेसामने, कोण ठरणार सरस?
India vs South Africa Womens World Cup 2025 Live Match Score : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना 2 स्टार खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील एकूण तिसरा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर लॉरा वोल्वार्ड्ट दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना केव्हा?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना गुरुवारी 9 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना कुठे?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना डॉक्टर वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह कुठे पाहता येईल?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
स्मृती मंझझाना विरुद्ध तांझिम ब्रिट्स
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना 2 चॅम्पियन खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना आणि दक्षिण आफ्रिकेची तांझिम ब्रिट्स यांच्याच चुरस असणार आहे. स्मृती आणि तांझिम या दोघी 2025 वर्षात सर्वाधिक शतंक करणाऱ्या महिला क्रिकेटपटू आहेत. स्मृतीने या वर्षात 4 शतकांसह 800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
तर एका वर्षात सर्वाधिक 5 शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड तांझिमच्या नावावर आहे.तांझिमने गेल्या सामन्यातच शतक केलं होतं. त्यामुळे आता स्मृती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करत तांझिमच्या विक्रमाची बरोबरी साधणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
