AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs wi : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये ‘या’ खेळाडूंना खेळावंच लागणार, नाहीतर bcci देणार नारळ?

आता खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबाबत बीसीसआय मवाळ भूमिका घेणार नाही असच दिसतंय. वेस्ट इंडिज दौऱ्यामधील दोन कसोटी सामन्यांसाठी कसोटी संघ जाहीर झाला आहे त्यातील काही खेळाडूंसाठी ही संधी असणार आहे.  नाहीतर त्यांचाही पत्ता कट होऊ शकतो.

ind vs wi : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये 'या' खेळाडूंना खेळावंच लागणार, नाहीतर bcci देणार नारळ?
बीसीसीआय आता तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघातील सिनिअर खेळाडूंचं वय आणि सुस्तावलेपणा पाहून त्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर काही खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे.
| Updated on: Jun 25, 2023 | 9:11 PM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज विरुध्दच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे. कसोटी संघामधून दोन मोठ्या खेळांडूना बाहेर करण्यात आलं आहे. यामधील एक म्हणजे उमेश यादव आणि दुसरा चेतेश्वर पुजारा आहे. दोघांनाही संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबाबत बीसीसआय मवाळ भूमिका घेणार नाही असच दिसतंय. वेस्ट इंडिज दौऱ्यामधील दोन कसोटी सामन्यांसाठी कसोटी संघ जाहीर झाला आहे त्यातील काही खेळाडूंसाठी ही संधी असणार आहे.  नाहीतर त्यांचाही पत्ता कट होऊ शकतो.

कोण आहेत ते खेळाडू?

या यादीमध्ये पहिला खेळाडू केएस भरत असणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेपासून संघात असलेल्या  के एस भरतला आपली विशेष छाप पाडता आली नाही. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये केएस भरतला मधल्या फळीत फलंदाजी करता आली नााही. त्यामुळे हा दौरा त्याच्यासाठी  महत्त्वाचा असणार आहे.

मागील काही दिवसांपासून खराब कामगिरी करत असलेल्या रोहित शर्मालाही या सीरिजमध्ये आपल्या जुन्या फॉर्ममध्ये याव लागणार आहे. डॉमिनिका आणि पोर्ट ऑफ स्पेन मध्ये होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहितने चांगली कामगिरी केली नाही तर, त्यालाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जावू शकतो.

अजिंक्य रहाणे याच्यासाठी ही मालिका म्हणजे सुवर्णसंधी असणार आहे. कारण आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने परत एकदा संघात कमबॅक केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात त्याने झुंजार खेळी करत संघाची बाजू लावून धरली होती. संघातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी या दौऱ्यात चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारताचा कसोटीसाठी संघ |रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.