IND vs WI : विंडीजचा फॉलोऑननंतर चिवट प्रतिकार, टीम इंडिया विरुद्ध 97 धावांनी पिछाडीवर
India vs West Indies 2nd Test Day Day 3 Highlights : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिले 2 दिवस आपल्या नावावर केले. मात्र विंडीजने तिसऱ्या दिवशी फॉलोऑननंतर जोरदार कमबॅक केलं.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाहुण्या वेस्ट इंडिजने तिसर्या दिवशी जोरदार पलटवार केला . टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 248 रन्सवर ऑलआऊट करत फॉलोऑन दिला. विंडीजने त्यानंतर चिवट बॅटिंग केली. विंडीजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 173 रन्स केल्या. मात्र विंडीज त्यानंतरही 97 धावांनी पिछाडीवर आहे.
विंडीजला चौथ्या दिवशी या उर्वरित 97 धावा पूर्ण करण्यासाठी असाच प्रतिकार करावा लागणार आहे. विंडीजसाठी जॉन कँपबेल आणि शाई होप जोडी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद परतली. जॉन 87 आणि होप 66 रन्सवर नॉट आऊट आहे. तसेच टीम इंडियाला चौथ्या दिवशी डावाने जिंकायचं असेल तर विंडीजला आणखी 97 धावा जोडण्याआधी ऑलआऊट करावं लागणार आहे.
विंडीजचा पहिला डाव
टीम इंडियाने विंडीजला दुसऱ्या डावातही सुरुवातीला झटपट 2 झटके दिले. मोहम्मद सिराज याने टेजनारायण चंद्रपॉल याला 10 रन्सवर आऊट केलं. शुबमन गिल याने चंद्रपॉलचा अप्रतिम कॅच घेतला. तर वॉशिंग्टन सुंदर याने एलिक अथानजे 7 रन्सवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे विंडीजची 2 आऊट 35 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर होप आणि कँपबेल या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंच चिवट बॅटिंग केली. विंडीजने अशाप्रकारे 49 ओव्हरमध्ये 173 रन्स केल्या.
विंडीजचं 248 रन्सवर पॅकअप
त्याआधी विंडीजला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर 518 रन्सच्या प्रत्युत्तरात 248 पर्यंतच मजल मारता आली. विंडीजने 4 आऊट 140 पासून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 108 धावांच्या मोबदल्यात उर्वरित 6 विकेट्स घेतल्या आणि विंडीजला फॉलोऑन दिला. विंडीजसाठी पहिल्या डावात एलिथ अथानजे याने सर्वाधिक 41 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही 40 पार मजल मारता आली नाही.
वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी भारताला झुंजवलं
That’s stumps on Day 3️⃣!
A wicket each for Mohd. Siraj and Washington Sundar 👍
West Indies trail #TeamIndia by 9️⃣7️⃣ runs (f/o)
Scorecard ▶️ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UVnrWKJ3Zb
— BCCI (@BCCI) October 12, 2025
कुलदीप यादवचा पंच
टीम इंडियाकडून एकट्या कुलदीपने अर्ध्या विंडीज टीमला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. कुलदीप व्यतिरिक्त रवींद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या.
