IND vs WI : जसप्रीत बुमराहचं डोकंच फिरलं, वैतागून स्टम्पवर मारला बॉल; असं केलं कारण की…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलोऑनचं संकट होतं. पण त्यांनी झुंजार खेळी केली आणि 120 धावा करत 121 धावा विजयासाठी दिल्या. या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराहच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने फॉलोऑन मिळाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. भारताने पहिल्या डावात 518 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 248 धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताकडे 270 धावांची मजबूत आघाडी होती. भारताने या आघाडीतच वेस्ट इंडिजला गुंडाळू असा आत्मविश्वास बाळगला होता. पण वेस्ट इंडिजने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दुसऱ्या डावात 390 धावांची खेळी केली करत आघाडी मोडून काढली. तसेच 120 धावांची आघाडी घेत विजयासाठी 121 धावा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं होतं हे स्पष्ट पाहायला मिळालं. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहाच्या चेहऱ्यावर संताप दिसला. त्यामुळेच त्याने रागाच्या भरात स्टंप पाडली. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला असं घडलं.
वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात आघाडी घेत होती. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतकी खेळी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज या कसोटीत फासे फिरवणार असंच वाटत होतं. कारण भारताची 270 धावांची त्यांनी मोडून काढली होती. वेस्ट इंडिजची चौथी विकेट 271 धावांवर पडली. यावरून अंदाज बांधता येईल. पण कुलदीप यादवसह इतर गोलंदाजांनी इतर गोलंदाजांनी जोर लावला आणि वेस्ट इंडिजचा डाव 390 धावांवर आटोपला. पण दुसऱ्या सत्रात 311 धावांवर 9 विकेट अशी स्थिती असताना सहज शेवटची विकेट मिळेल असं वाटत होतं. पण सातव्या क्रमांकाच्या जस्टीन ग्रीव्स आणि शेवटी आलेल्या जेडन सील्सने डोकेदुखी वाढवली.
भारताकडून दुसऱ्या डावात 103वं षटक टाकण्यासाठी बुमराह मैदानात आला. तेव्हा जस्टिन ग्रीव्ह्सने सलग दोन स्ट्रेट ड्राइव्ह मारले. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. त्याने दोन धावा काढताच बुमराह काढल्याचं पाहून बुमराहच्या हाती चेंडू आल्यावर त्याने राग व्यक्त केल्या. त्याने थेट चेंडू विकेटवर मारली. तेव्हा दोन्ही खेळाडू क्रिजमध्ये होते. बुमराहच्या या कृतीतून संताप दिसत होता. शेवटच्या विकेटसाठी झालेली भागीदारी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत होतं. शेवटच्या विकेटसाठी पंचांनी टी ब्रेक अर्धा पुढे वाढवला. पण दोघांनी विकेट काही पडली नाही. त्याने शेवटच्या सेशनपर्यंत सामना खेचला. टी ब्रेकनंतर अखेर विकेट मिळाली.
