AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs wi T-20 | टीम इंडियाच्या पराभवाबाबत बोलताना पंड्याने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

Hardik Pandya on Ind vs wi : सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर काही खेळाडूंवर फोडलं आहे. यावेळी बोलताना पंड्याने नेमका सामना कुठे गमावला हेसुद्धा सांगितलं आहे. या पराभवामुळे हार्दिक पंड्या संतापलेला दिसला.

ind vs wi T-20 | टीम इंडियाच्या पराभवाबाबत बोलताना पंड्याने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार
| Updated on: Aug 04, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 4 धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला आहे. युवा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्याला पहिल्याच सामन्यात अपयश आलं आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर काही खेळाडूंवर फोडलं आहे. यावेळी बोलताना पंड्याने नेमका सामना कुठे गमावला हेसुद्धा सांगितलं आहे. या पराभवामुळे हार्दिक पंड्या संतापलेला दिसला.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या लक्ष्याचा आम्ही व्यवस्थित पाठलाग करत होतो. पण सामना मध्यावर गेला असताना आम्ही काही चुका केल्या आणि त्याचाच आम्हाला फटका बसला. मला वाटतं की, टी-20 क्रिकेटमध्ये तुम्ही सलग विकेट गमावल्या तर टार्गेटचा पाठलाग करणं कठीण होऊन जातं आणि तिच चूक आमच्याकडून झाली. सलग दोन विकेट गमावल्याने आम्हाला त्याचा मोठा फटका बसला आणि सामना गमवावा लागला असल्याचं हार्दिक पंड्याने सांगितलं

…म्हणून तिन्ही स्पिनर्सला का खेळवलं!

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. यावर बोलताना, दोन स्पिनर्स आणि अक्षर पटेल याला स्पिनर आणि फलंदाज म्हणून संघात ठेवलं. जेणेकरून संघ संतुलित झाल्याचं हार्दिकने सांगितलं. त्यासोबतच पदार्पणवीर तिलव वर्मा आणि मुकेश कुमार यांनी दमदार कामगिरी केली असल्याचंही पंड्या म्हणाला.

सामन्याचा धावता आढावा

वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 149-6 धावा केल्या होत्या. यामध्ये निकोलस पूरन 41 धावा आणि रोवमॅन पावेल 48 धावा दोघांनी महत्त्वाची खेळी केली. अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंंडियाला 20 षटकांमध्ये  145 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून तिलक वर्मा सोडता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या गाठता आली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत आता वेस्ट इंडिज संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.