AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL Toss : श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा निर्णय, टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत स्मृतीबाबत म्हणाली…

India Women vs Sri Lanka Women Toss Result : श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता महिला ब्रिगेड श्रीलंकेसमोर किती धावांचा डोंगर उभारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

IND vs SL Toss : श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा निर्णय, टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत स्मृतीबाबत म्हणाली...
IND vs SL Womens TossImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2025 | 4:11 PM
Share

आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. श्रीलंकेची कॅप्टन चामारी अट्टापट्टू हीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कोणता संघ जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी?

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. याबाबतची माहिती कर्णधार हरमनप्रीत कौर हीने दिली. आम्हीही टॉस जिंकून बॉलिंग घेणार होतो असं हरमनप्रीतने टॉसनंतर म्हटलं.

हरमनप्रीत काय म्हणाली?

“आम्हालाही बॉलिंग करायची होती. खेळपट्टी खूप चांगली दिसतेय. आम्ही मोठी धावसंख्या उभारु”, असा विश्वास हरमनप्रीतने व्यक्त केला.

“टीममधील सर्व खेळाडू फिट असल्याचं हरमनप्रीतने सांगितलं. तसेच हरमनप्रीतने प्लेइंग ईलेव्हनचा फॉर्म्युलाही सांगितला.

“सगळेच फिट आहेत, आम्ही 3 फिरकी आणि 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहोत. स्मृती नेहमीच आमच्यासाठी सरस राहिली आहे. स्मृती सातत्याने चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे”, असंही हरमनप्रीतने टॉसनंतर म्हटलं.

12 वर्षांनंतर भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन

दरम्यान यंदाच्या 13 व्या वनडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. तसेच भारतात 13 वर्षांनंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी भारतात 1978, 1997 आणि 2013 साली वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय महिला संघाला आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेलं नाही. भारताला 2005 आणि 2017 अशा 2 वेळेस वर्ल्ड कपने हुलकावणी दिली. भारताला 2 वेळा उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं. त्यामुळे आता टीम इंडिया यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चामारी अट्टापट्टू (कॅप्टन), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रम, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी(विकेटकीपर), अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी आणि इनोका रणवीरा.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.