Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तसं झालं तर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना होणार, कसं काय ते जाणून घ्या

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता असताना दोन्ही संघ या स्पर्धेत दोनदा भिडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचं संपूर्ण समीकरण समजून घ्या.

… तसं झालं तर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना होणार, कसं काय ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 18, 2025 | 3:08 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 19 फेब्रुवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. 20 फेब्रुवारीला भारत आणि बांग्लादेश हे संघ भिडणार आहेत. असं असलं तरी भारत आणि पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता अधिक आहे. कारण दोन्ही देश हे आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतात. भारत आणि पाकिस्तान हा सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. पण तुम्हाला माहिती का? भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना होण्याची शक्यता आहे. आता तु्म्ही म्हणाल कसं शक्य आहे. तर दोन्ही देश अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात. त्याचं गणित असं की, दोन्ही साखळी फेरीत एकाच गटात आहेत. दोन्ही देशांनी उपांत्य फेरी गाठली आणि अंतिम फेरीत पोहोचले तर हे समीकरण शक्य आहे. असंच समीकरण 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत जुळून आलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना पार पडला होता. तेव्हा भारातने 48 षटकात 3 गडी गमवून 319 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे 41 षटकांचा सामना झाला आणि 289 धावांचं टार्गेट दिलं गेलं. तेव्हा भारताने पाकिस्तानला 124 धावांनी पराभूत केलं होतं. उपांत्य फेरीत तेव्हा भारत विरुद्ध बांग्लादेश आणि पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा सामना झाला. उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत एकमेकांसमोर दुसऱ्यांदा उभे ठाकले. पण अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी दोन्ही संघांचे खेळाडू

भारत : श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह और वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान : फखर जमान, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आजम, खुशदिल शाह, फहीम अशरफ, अबरार अहमद, शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह, कामरान गुलाम, तैयब ताहिर, सलमान अली आगा, मुहम्मद हसनैन और हारिस रऊफ.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.