AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर बाहेर गेल्यानंतरही टीम इंडिया संकटात, असं का ते जाणून घ्या

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी इंग्लंड संघाने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केला आहे. तीन दिग्गज खेळाडू या सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन कमी होण्याऐवजी वाढल्याची चर्चा रंगली आहे. असं का ते समजून घ्या.

IND vs ENG : बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर बाहेर गेल्यानंतरही टीम इंडिया संकटात, असं का ते जाणून घ्या
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर बाहेर गेल्यानंतरही टीम इंडिया संकटात, असं का ते जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Jul 30, 2025 | 6:28 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार आहे. सामना ड्रॉ किंवा इंग्लंडने जिंकला तर मालिका त्याच्या खिशात जाईल. पण भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. तसेच वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेतही भारताला जबर फायदा होत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. असं असताना इंग्लंडने ओव्हल कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत. या कसोटी सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स खेळणार नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा ओली पोपच्या खांद्यावर दिली आहेत. तसेच जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे देखील प्लेइंग 11 मधून बाहेर आहेत. या तीन दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडियाला फायदा होईल असं वाटत होतं. पण तसं काही नसून उलट आणखी सतर्क राहावं लागणार आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चरसारखे दिग्गज खेळाडू नसले तरी या मागचं दुसरं गणित समजून घेणं आवश्यक आहे.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हनमध्ये असा बदल

ओव्हल कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. यात एक फिरकीपटूचा समावेश केला आहे. इंग्लंडने प्लेइंग 11 मध्ये ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओव्हर्टन आणि जॉश टंग यांना संधी दिली आहे. हे चारही वेगवान गोलंदाज आहेत. यात तीन गोलंदाज चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे इंग्लंडची रणनिती पाहून भारतीय संघाची चिंता वाढळी आहे. इंग्लंडने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिल्याने ही खेळपट्टी स्विंगला मदत करणारी असू शकते. त्यामुळे भारताला रणनितीत बदल करावा लागणार आहे. कारण आतापर्यंत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम मानली जात होती. पण इंग्लंडची प्लेइंग 11 पाहून गाफील राहण्यात अर्थ नाही.

22 यार्डच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळेल असं दिसत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करणं कठीण जाईल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर सर्व काही अवलंबून असणार आहे. चेंडू स्विंग झाला तर सिराज आणि आकाश दीपला मदत मिळेल. अर्शदीपला संधी मिळाली तर गोलंदाजीत आणखी ताकद वाढेल. दुसरीकडे, बुमराह खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नहाी. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला सावध पावलं टाकावी लागणार आहेत.

इंग्लंडची प्लेइंग 11 : जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.