IND vs ENG 1st Test Day 2 Live : टीम इंडियाची दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात, लंचनंतर संघ डगमगला, नंतर पावसामुळे खेळ थांबला

| Updated on: Aug 07, 2021 | 3:53 PM

India vs England 1st Test Day 2 Live Score: भारतीय संघाने पहिल्या दिवशीू इंग्लंडला 183 धावांवर सर्वबाद केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे.

IND vs ENG 1st Test Day 2 Live : टीम इंडियाची दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात, लंचनंतर संघ डगमगला, नंतर पावसामुळे खेळ थांबला
भारत विरुद्ध इंग्लंड

Ind vs Eng 1st Test, Day 2 :  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. खराब वातावरण आणि पावसामुळे अखेर सामना थांबवण्यात आला. सामन्याचा उर्वरित खेळ आता उद्या तिसऱ्या दिवसापासून सुरु होईल. दरम्यान, या सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला होता. कारण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 183 धावांवर रोखलं होतं. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगलीच ठरली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानावर तग धरुन खेळत होते. पण लंचब्रेक आधीच्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. भारताची 97 धावावर रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट पडली.

लंचब्रेक नंतर भारतीय संघाला उतरती कळाच लागली. कारण काही धावांच्या अंतरावर भारताचे एकामागेएक असे मातब्बर शिलेदार तंबूत जाताना दिसले. विशेष म्हणजे इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अडरसन याने कर्णधार विराट कोहली याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर बेअरस्टोने अजिंक्य राहणे याला धावबाद केलं. एकीकडे विकेट पडत होत्या दुसऱ्या बाजूने केएल राहूल एकेरी कमान सांभाळण्याच्या प्रयत्नात दिसला. तो ऋषभ पंतसोबत डाव सावरण्याचा प्रयत्नात होता पण पावसाने खेळात व्यत्यय आणला. अखेर खेळ तात्पुरता थांबवण्यात आला.

पहिला दिवस हा टीम इंडियाचा, दुसरा संमिश्र स्वरुपाचा

इंग्लंडच्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस बुधवारी (4 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना 66 षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा 65.4 षटकात 10 बाद 183 धावांवर थांबला. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने 3 तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाचे सलामीवर रोहित शर्मा आणि के एल राहुल पहिल्या डावासाठी मैदानावर उतरले. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने एकही बळी न जाऊ देता 13 षटकात 21 धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिबली हे सलामीसाठी मैदानात उतरले. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला झटका दिला. बुमराहच्या बोलवर बर्न्स हा पायचित पडला. विशेष म्हण बर्न्स पाच चेंडू खेळला. पण त्याला एकही धाव घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो शून्यावरच तंबूत परतला. त्यानंतर झॅक क्रॉले हा मैदानात आला. क्रॉले याने सिबलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 20 व्या षटकात सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. त्यामुळे तो झेलबाद झाला. क्रॉले याने 27 धावा केल्या. यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. इंग्लंडच्या या दोन विकेटनंतर लंचब्रेक झाला.

लंचब्रेकनंतर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील खातं उघडलं. शमीने डॉमिनिक सिबली याला झेलबाद केलं. सिबलीने 2 चौकारांसह 18 धावा केल्या. त्यानंतर जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ते मैदानावर तग धरुन खेळत राहिले. पण अखेर मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. शमीने बेअरस्टोला पायचित पकडले. त्यामुळे बेअरस्टोला 29 धावांवर समाधान मानावे लागले. रुट आणि बेअरस्टो यांनी 72 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रुटने आपले अर्धशतक साजरी केले. शार्दुल ठाकूरने त्याला अखेर पायचित पकडत बाद केलं. रुटने 64 धावा केल्या. यामध्ये तब्बल 11 चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर काही धावांच्या फरकावर एकामागे एक असे ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन बाद झाले. अखेर 65.4 षटकात इंग्लंडचा पूर्ण संघ 183 धावात तंबूत परतला.

Key Events

भारतीय गोलंदाजाची कमाल

भारतीय गोलंदाजानी पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 183 धावांवर सर्वबाद केलं. यावेळी जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

भारतीय फलंदाजावर मदार

भारताच्या गोलंदाजानी उत्तम खेळ करत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 183 धावांवर आटोपला. ज्यानंतर भारताने फलंदाजी सुरु केली आहे. आता भारतीय फलंदाजानी 183 धावा पार करुन एक मोठं लक्ष इंग्लंड समोर ठेवणं गरजेच आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Aug 2021 08:50 PM (IST)

    पुन्हा पावसाला सुरुवात, खेळ पुन्हा थांबवला

    पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला आहे.

  • 05 Aug 2021 08:48 PM (IST)

    पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात

    पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात, टीम इंडियाचे ऋषभ पंत आणि के एल राहूल मैदानात

  • 05 Aug 2021 06:46 PM (IST)

    IND vs ENG : अजिंक्य रहाणेही बाद

    भारताचे दिग्गज फलंदाज लवकर बाद होण्याचं सत्र WTC Final नंतर अजूनही थांबलेल नाही. कोहली आणि पुजारा पाठोपाठ रहाणेही बाद झाला आहे. सध्या पंत आणि राहुल फलंदाजी करत आहेत.

  • 05 Aug 2021 06:36 PM (IST)

    IND vs ENG : केएल राहुलचे अर्धशतक

    भारताची नौका डळमळत असताना भारताचा सलामीवीर केएल राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 128 चेंडूत राहुलने कारकिर्दीतील 12 वं अर्धशतक ठोकलं आहे.

  • 05 Aug 2021 06:34 PM (IST)

    IND vs ENG : एकाच ओव्हरमध्ये भारताचे दोन गडी बाद

    इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने एकाच ओव्हरमध्ये भारताचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले आहेत. पुजारा 4 धावांवर तर कर्णधार कोहली 0 धावा करुन बाद झाला आहे. दोघांचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला आहे.

  • 05 Aug 2021 06:18 PM (IST)

    IND vs ENG : पुजारा फलंदाजीला, भारताच्या 100 धावा पूर्ण

    दुसऱ्या दिवसाची चांगली सुरुवात केल्यानंतर 97 धावांवर भारताचा पहिला गडी रोहित शर्माच्या रुपात बाद झाला. ज्यानंतर पुजारा आणि राहुल फलंदाजी करत असून भारताच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 05 Aug 2021 05:30 PM (IST)

    IND vs ENG : रोहित शर्मा 36 धावा करुन बाद

    भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 36 धावा करुन बाद झाल्याने भारताचा पहिला गडी तंबूत परतला आहे. रॉबिनसनच्या बोलिंगवर सॅम करनने कॅच पकडत शर्माला बाद केलं आहे.

  • 05 Aug 2021 05:20 PM (IST)

    IND vs ENG : भारतीय फलंदाज चांगल्या स्थितीत

    दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली आहे. भारताचे  सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा दोघांनी उत्तम फलंदाजी करत क्रिजवर ठाण मारलं आहे.

  • 05 Aug 2021 04:54 PM (IST)

    भारताच्या 30 ओव्हरनंतर 62 धावा

    भारताच्या 30 ओव्हरनंतर 62 धावा झाल्या आहेत. दोन्ही सलामीवीर मैदानावर तळ ठोकून उभे आहेत.

  • 05 Aug 2021 04:00 PM (IST)

    IND vs ENG : अँडरसनची भेदक गोलंदाजी

    इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने उत्तम गोलंदाजीला सुरुवात केली आहे. त्याने सलग तीन मेडन ओव्हर टाकत भारतीय फलंदाजाना एकही धाव घेऊ दिली नाही.

  • 05 Aug 2021 03:43 PM (IST)

    IND vs ENG : इंग्लंडकडून दिग्गज अँडरसन गोलंदाजीला

    दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंड संघाला विकेट्सची अत्यंत गरज आहे. अशावेळी संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.

  • 05 Aug 2021 03:42 PM (IST)

    IND vs ENG : भारताचे सलामीवीर मैदानात

    भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात फलंदाजीने केली आहे. भारताचा केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात उतरली आहे.

  • 05 Aug 2021 03:41 PM (IST)

    IND vs ENG : फलंदाजीसाठी उत्तम वातावरण

    भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील दुसरा दिवस सुरु झाला असून फलंदाजीसाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले आहेत. आजचे वातावरण फलंदाजीसाठी चांगले आहे.

Published On - Aug 05,2021 3:38 PM

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.