IND vs ENG 3rd Test Day 2 Live : दिवसअखेर इंग्लंडची 8 बाद 423 धावांपर्यंत मजल, रुटचं सलग तिसरं शतक

India vs England 1st Test Day 1 Live Score: तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघासाठी फार निराशाजनक ठरला एकीकडे भारतीय फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. तर दुसरीकडे गोलंदाजाना दिवसभरात एकही विकेट मिळवता आली नाही. आज दुसऱ्या दिवशी भारताकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

IND vs ENG 3rd Test Day 2 Live : दिवसअखेर इंग्लंडची 8 बाद 423 धावांपर्यंत मजल, रुटचं सलग तिसरं शतक
भारत विरुद्ध इंग्लंड

तिसऱ्या कसोटीची सुरुवातच भारतासाठी खराब झाली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. पण पहिल्या डावात टीम इंडिया केवळ 78 धावांत गारद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने काल (पहिल्या) दिवसअखेर बिनबाद 12 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. कर्णधार जो रुटच्या शतकी (121) खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Match Highlights

 • इंग्लंडची मजबूत फलंदाजी

  इंग्लंडकडून आतापर्यंत या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलद तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिवसअखेर क्रेग ओव्हरटन (24) आणि ऑली रॉबिन्सन (0) नाबाद पव्हेलियनकडे परतले.

 • भारतीय गोलंदाजीचा कस

  फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातं उघडता आलं नाही.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 26 Aug 2021 23:00 PM (IST)

  इंग्लंडला 8 वा झटका, सॅम करन 15 धावांवर बाद

  img

  भारताला 8 वं यश मिळालं आहे. मोहम्मद सिराजने सॅम करनला 15 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (इंग्लंड 418/8)

 • 26 Aug 2021 22:20 PM (IST)

  भारताला सातवं यश, मोईन अली शून्यावर बाद

  img

  भारताला 7 वी विकेट मिळाली आहे. मोईन अली रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकडे (सब्स्टिट्युट) झेल देत बाद झाला. (इंग्लंड 383/6)

 • 26 Aug 2021 22:16 PM (IST)

  भारताला मोठं यश, जसप्रीत बुमराहकडून शतकवीर जो रुटची शिकार

  img

  भारताला मोठं यश मिळालं आहे. मैदानात नांगर टाकून चौफेर फटकेबाजी करणाऱ्या जो रुटला बाद करण्यात भारतीय संघाला यश आलं आहे. 118 व्या षटकात जसप्रीत बुमराहने रुटला त्रिफळाचित केलं. रुटने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. (इंग्लंड 383/6)

 • 26 Aug 2021 21:51 PM (IST)

  इंग्लंडला पाचवा झटका, जॉस बटलर 7 धावांवर बाद

  img

  इंग्लंडने 5 वी विकेट गमावली आहे. मोहम्मद शमीने जॉस बटलरला इशांत शर्माकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 360/5)

 • 26 Aug 2021 21:33 PM (IST)

  भारताला चौथ यश, जॉनी बेअरस्टो बाद

  भारताला चौथ यश, जॉनी बेअरस्टो बाद

 • 26 Aug 2021 21:29 PM (IST)

  जो रुटचं शतक

  img

  104 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शानदार चौकार लगावत जो रुटने शतक झळकावलं. या मालिकेतलं रुटचं हे सलग तिसरं शतक आहे. त्याने 122 चेंडूत 100 धावा फटकावल्या. (इंग्लंड 335/3)

 • 26 Aug 2021 20:57 PM (IST)

  3 गड्यांच्या बदल्यात इंग्लंडची त्रिशतकी मजल, रुटची शतकाकडे वाटचाल

  3 गड्यांच्या बदल्यात इंग्लंडने त्रिशतकी मजल मारली आहे. 100 षटकात इंग्लंडने 313 धावा जमवल्या आहेत. कर्णधार रुट 93 धावांवर खेळतोय, सोबत जॉनी बेअरस्टो 6 धावांवर खेळतोय.

 • 26 Aug 2021 20:36 PM (IST)

  भारताला तिसरं यश, डेव्हिड मलान 70 धावांवर बाद

  img

  भारताला तिसरी विकेट मिळाली आहे. 94 व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने अप्रतिम झेल टिपत मलानला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (इंग्लंड 298/3)

 • 26 Aug 2021 19:40 PM (IST)

  रुट-मलानची शतकी भागीदारी, इंग्लंड 250 पार

  हासीब हमीद बाद झाल्यानंतर डेव्हिड मलान (60) आणि कर्णधार जो रुट (66) या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत शतकी भागीदारी केली आहे. (इंग्लंड 274/2)

 • 26 Aug 2021 19:16 PM (IST)

  IND vs ENG : जो रुटचं वेगवान अर्धशतक

  इंग्लंडच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या कर्णधाराने देखील सुंदर अर्धशतक ठोकलं आहे. जो रुटने 57 चेडूंत 7 चौकार ठोकत कारकिर्दीतील 51वं अर्धशतक ठोकलं.

 • 26 Aug 2021 18:30 PM (IST)

  IND vs ENG : दुसऱ्या सेशनला सुरुवात

  दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली असून इंग्लंडकडून कर्णधार जो रुट आणि डेविड मलान हे दोघे फलंदाजी करत आहेत.

 • 26 Aug 2021 17:43 PM (IST)

  IND vs ENG : दिवसातील पहिलं सेशन समाप्त

  दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सेशनचा खेळ संपलेला आहे. या सेशनमध्ये इंग्लंडने 62 धावा करत 2 विकेट्स गमावले. इंग्लंज संघाने 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली असून अजूनही त्यांच्या हातात 8 विकेट्स आहेत.

 • 26 Aug 2021 17:31 PM (IST)

  IND vs ENG : इंग्लंडची 100 धावांची आघाडी पूर्ण

  भारताने 78 धावा केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने उत्तम फलंदाजी केली आहे. आतापर्यंत केवळ दोनच विकेट गेल्या असून इंग्लंड संघाचा स्कोर 178 वर 2 बाद झाला आहे. सध्या कर्णधार जो रुट आणि मलान खेळत असून इंग्लंडने 100 धावांची आघाडी घेतली आहे.

 • 26 Aug 2021 17:13 PM (IST)

  IND vs ENG : भारताला दुसरं यश

  img

  भारताला अष्टपैलू रवींद्र जाडेजाने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवून दिली आहे. जाडेजाने सेट बॅट्समन हमीदला त्रिफळाचीत केलं आहे. हमीद 68 धावा करुन बाद झाला आहे.

 • 26 Aug 2021 16:11 PM (IST)

  IND vs ENG : इंग्लंडचा पहिला गडी बाद

  img

  प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर अखेर भारताला पहिला विकेट मिळाला आहे. मोहम्मद शमीने उत्कृष्ट त्रिफळा उडवत इंग्लंडच्या रॉरी बर्न्सला बाद केलं आहे.

 • 26 Aug 2021 15:44 PM (IST)

  IND vs ENG : भारताला विकेटची प्रतिक्षा

  भारतीय संघाचा पहिला डाव 78 धावांत आटोपल्यानंतर भारतीय गोलंदाजानाही खास कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या दिवशी 120 धावानंतरही एकही विकेट मिळालेला नाही. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला असून भारतीय संघ पहिल्या विकेटची आतुरतने वाट पाहत आहे.

 • 26 Aug 2021 15:41 PM (IST)

  IND vs ENG : दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु

  दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंड संघाने 120 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI