IND vs ENG 4th Test Day 1 Live : दिवसअखेर इंग्लंडची 3 बाद 53 धावांपर्यंत मजल, भारताकडे अद्याप 138 धावांची आघाडी

India vs England 4th Test Day 1 Live Score: चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघानी दोन-दोन बदल केले आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे.

IND vs ENG 4th Test Day 1 Live : दिवसअखेर इंग्लंडची 3 बाद 53 धावांपर्यंत मजल, भारताकडे अद्याप 138 धावांची आघाडी
भारत विरुद्ध इंग्लंड

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला आहे. सध्या सुरु असलेला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला.

आधी कर्णधार विराट कोहलीचं (50) अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने (57) जोरदार फटकेबाजी करत ठोकलेलं अर्धशतक, याच्या जोरावर भारतीय संघाने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. विराट-शार्दुलव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. त्याउलट इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. इंग्लंडकडून या डावात ख्रिस वोक्सने 4, ऑली रॉबिन्सनने 3, जेम्स अँडरसनने 1 आणि क्रेग ओव्हरटनने एक विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताची स्थिती मजबूत केली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपायला एकच षटक बाकी असताना उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद करत दिवसाची गोड सांगता केली. तोपर्यंत इंग्लंडने 17 षटकात 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप या डावात 138 धावांनी आघाडीवर आहे.

Match Highlights

 • शार्दुल ठाकूरची फटकेबाजी, 31 चेंडूत अर्धशतक

  टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकलेली असताना, लॉर्ड शार्दुल ठाकूर मात्र त्यांच्या गोलंदाजांना भिडला. नुसता भिडला नाही तर त्याने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला 200 धावांच्या आसपास मजल मारता आली. शार्दुलआधी इंग्लंडमध्ये सर्वात जलद ठोकण्याचा रेकॉर्ड कपिल देव (30 चेंडू) यांच्या नावावर आहे. या यादीत आता शार्दुलचंदेखील नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. शार्दुलने या डावात 36 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा चोपल्या.

 • मालिकेत आघाडीसाठी दोन्ही संघ सज्ज

  भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण ही आघाडी कायम ठेवण्यात तिसऱ्या कसोटीत भारताला यश आलं नाही. तिसरी कसोटी भारताने एक डाव 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडीसाछी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 02 Sep 2021 22:55 PM (IST)

  भारताला मोठं यश, इंग्लंडचा कर्णधार जो रुट 21 धावांवर बाद, उमेश यादवचा कारनामा

  img

  भारताला मोठं यश मिळालं आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट 21 धावांवर असताना उमेश यादवने त्याला त्रिफळाचित केलं. (इंग्लंड 52/3)

 • 02 Sep 2021 22:10 PM (IST)

  इंग्लंडचा दुसरा धक्का, सलामीवीर हासीब हमीद शून्यावर बाद

  img

  इंग्लडला एकाच षटकात दुसरा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहने सलामीवीर हासीब हमीदला शून्यावर बाद केलं. (इंग्लंड 6/2)

 • 02 Sep 2021 22:04 PM (IST)

  भारताला पहिलं यश, सलामीवीर रॉरी बर्न्स 5 धावांवर बाद

  img

  भारताला पहिलं यश मिळालं आहे. जसप्रीत बुमराहने सलामीवीर रॉरी बर्न्स याला त्रिफळाचित केलं (इंग्लंड 5/1)

 • 02 Sep 2021 21:41 PM (IST)

  भारताचा अखेरचा फलंदाज माघारी, उमेश यादव 10 धावांवर बाद

  img

  भारताने अखेरची विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने उमेश यादवला 10 धावांवर बाद केलं. (भारत 191/10)

 • 02 Sep 2021 21:30 PM (IST)

  भारताचा आठवा गडी माघारी, शार्दुल ठाकूर 57 धावांवर बाद

  img

  भारताने 8 वी विकेट गमावली आहे. ख्रिस वोक्सने शार्दुल ठाकूरला 57 धावांवर असताना पायचित केलं. (भारत 190/8)

 • 02 Sep 2021 21:00 PM (IST)

  भारताला 7 वा झटका, रिषभ पंत 9 धावांवर बाद

  img

  भारताने 7 वी विकेट गमावली आहे. ख्रिस वोक्सने रिषभ पंतना मोईन अलीकरवी झेलबाद केलं. (भारत 127/7)

 • 02 Sep 2021 20:04 PM (IST)

  इंग्लंडला सहावं यश, अजिंक्य रहाणे 14 धावांवर बाद

  img

  भारताने सहावी विकेट गमावली आहे. क्रेग ओव्हर्टन याने अजिंक्य रहाणेला मोईन अलीकरवी झेलबाद केलं. त्याने 14 धावांचं योगदान दिलं. (भारत 117/6)

 • 02 Sep 2021 19:35 PM (IST)

  भारताला मोठा झटका, विराट कोहली 50 धावांवर बाद

  img

  भारताने महत्त्वाची विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने विराट कोहलीला (50) यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. (भारत 105/5)

 • 02 Sep 2021 19:24 PM (IST)

  विराट कोहलीचं 27 वं अर्धशतक

  img

  कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतलं 27 वं अर्धशतक झळकावलं आहे. 40 व्या षटकात जेम्स अँडरसनला शानदार चौकार लगावला, त्यानंतर क्विक सिंगल घेत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 85 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तसेच 40 षटकांमध्ये भारताने 105 धावा जमवल्या आहेत.

 • 02 Sep 2021 19:16 PM (IST)

  विराटची आक्रमक फटकेबाजी, भारताचं शतक

  चौथ्या कसोटी सामन्यात सुरुवातीलाच भारतीय संघाने चार विकेट्स गमावल्या असल्या तरी कर्णधार विराट कोहलीने फटकेबाजी सुरुच ठेवली आहे. दरम्यान, 39 षटकात भारताने धावफलकावर शतक झळकावलं आहे. विराट 45 धावांवर नाबाद आहे.

 • 02 Sep 2021 19:01 PM (IST)

  IND vs ENG : कर्णधार, उपकर्णधार मैदानात

  सध्या भारताला एका चांगल्या भागिदारीची गरज आहे. सध्या कर्णधार विराट कोहली आण उपकर्णधार अंजिक्य रहाणे मैदानात आहे.

 • 02 Sep 2021 18:34 PM (IST)

  IND vs ENG : 10 धावा करुन जाडेजा बाद

  भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने पुन्हा एक चांगली खेळी करण्याची संधी घालवली आहे. अवघ्या 10 धावांवर वोक्सने त्याला बाद केलं आहे. जो रुटने स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला.

 • 02 Sep 2021 18:23 PM (IST)

  IND vs ENG : सामन्याला पुन्हा सुरुवात

  लंच ब्रेकनंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली रवींद्र जाडेजासोबत संयमी खेळी करताना दिसत आहे.

 • 02 Sep 2021 17:37 PM (IST)

  IND vs ENG : पहिलं सेशन समाप्त, सामन्यात लंच ब्रेक

  दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून लंच ब्रेक झाला आहे. भारताची अवस्था लंचपूर्वी अतिशय खराब झाली आहे. भारताचे तीन गडी तंबूत परतले असून सघ्या विराट (18) आणि जाडेजा (2) खेळत आहेत.

 • 02 Sep 2021 17:30 PM (IST)

  IND vs ENG : विराट कोहली ‘नॉट आऊट 23000’

  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

 • 02 Sep 2021 17:11 PM (IST)

  IND vs ENG : पुजाराही बाद, भारत अडचणीत

  img

  भारतीय संघाच्या अडचणीत वाढ सुरुच असून चेतेश्वर पुजाराही अवघ्या 4 धावा करुन बाद झाला आहे. अँडरसनच्या चेंडूवर यष्टीरक्षक जॉनीने पुजाराचा झेल घेतला आहे.

 • 02 Sep 2021 16:49 PM (IST)

  IND vs ENG : भारताला दुसरा झटका

  img

  भारताचा सलामीवीर केएल राहुलही बाद झाला आहे. सुरुवातीला काहीसा लयीत दिसणाऱ्या राहुलला 17 धावांवर रोबिन्सनने पायचीत केलं आहे.

 • 02 Sep 2021 16:15 PM (IST)

  IND vs ENG : रोहित शर्मा बाद

  img

  आज मालिकेत पदार्पण करणाऱ्या ख्रिस वोक्सने रोहितला बाद केलं आहे. ख्रिसच्या बोलिंगवर यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोने रोहितचा झेल पकडला आहे.

 • 02 Sep 2021 15:42 PM (IST)

  IND vs ENG : सामन्यातील पहिला चौकार

  img

  सामन्यातील पहिला चौकार जेम्स अंडरसनच्या तिसऱ्या ओवरमध्ये केएल राहुलने ठोकला आहे. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.

 • 02 Sep 2021 15:41 PM (IST)

  IND vs ENG : 8 महिन्यांनतर उमेश यादवचं पुनरागमन

  भारतीय संघात चौथ्या कसोटीसाठी करण्यात आलेल्या दोन बदलांमध्ये उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे. उमेशने 8 महिन्यांनतर कसोटी संघात स्थान मिळवलं आहे. याआधी तो डिसेंबर, 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळला होता.

 • 02 Sep 2021 15:35 PM (IST)

  ‘हे’ आहेत अंतिम 11

  भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  इंग्लंड: जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, ऑली पोप, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली (उपकर्णधार), क्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, क्रेग ओवर्टन, जेम्स अँडरसन.

 • 02 Sep 2021 15:31 PM (IST)

  IND vs ENG : दोन्ही संघात 2-2 बदल

  भारतीय संघात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादवला संधी दिली आहे. तर इंग्लंडच्या संघात सॅम करनच्या जागी ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या जागी ओली पोप खेळणार आहे.

   

 • 02 Sep 2021 15:30 PM (IST)

  IND vs ENG : नाणेफेक जिंकत इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय

  रत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI