IND vs ENG 4th Test Day 5 Live : भारताकडून इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा, मालिकेत 2-1 अशी आघाडी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Sep 06, 2021 | 11:15 PM

India vs England 4th Test Day 5 Live Score: भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडला 368 धावांचे मोठे लक्ष दिले आहे. पण इंग्लंडचे फलंदाजही चोख प्रत्यूत्तर देताना दिसत आहेत.

IND vs ENG 4th Test Day 5 Live : भारताकडून इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारत विरुद्ध इंग्लंड

IND vs ENG : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

Key Events

इंग्लंड संघाला उतरती कळा

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात भारताच्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करण्यात आली. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हासिब हमीद यांनी शतकी भागिदारी केली. पण रॉरीचं अर्धशतक होताच 100 धावांवर इंग्लंडची पहिली विकेट पडली. त्यानंतर हासिबने डाव सांभाळायचा प्रयत्न केला. पण 62 व्या ओव्हरमध्ये जाडेजाने हासिबला बाद करत दोन्ही सेट फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर एक एक करुन इंग्लंडचे खेळाडू तंबूत परतू लागले. आतापर्यंत सहा इंग्लंडवासी तंबूत परतले असून जाडेजा आणि बुमराहने 2-2 तर शार्दूलने एक विकेट घेतला आहे. एक खेळाडू धावचीत झाला आहे.

गोलंदाजांचा टिच्चून मारा

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा डाव 210 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश मिळालं. या डावात भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजाने प्रतेयकी 2 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावातही चांगली कामगिरी केली होती. पहिल्या डावातही उमेश यादवने 3, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी दोन, तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 06 Sep 2021 09:11 PM (IST)

  इंग्लंडचा अखेरचा फलंदाज बाद, अँडरसन 2 धावांवर बाद

  उमेश यादवने जेम्स अँडरसनला यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद करत इंग्लंडचा अखेरचा फलंदाज बाद केला आहे.

 • 06 Sep 2021 08:54 PM (IST)

  इंग्लंडचा 9 वा गडी माघारी, भारत विजयापासून एक पाऊल दूर

  इंग्लंडचा 9 वा गडी बाद झाला आहे. उमेश यादवने क्रेग ओव्हर्टनला 10 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (इंग्लंड 202/9)

 • 06 Sep 2021 08:14 PM (IST)

  इंग्लंडचा आठवा गडी माघारी, उमेश यादवकडून ख्रिस वोक्सची शिकार

  भारताला आठवं यश मिळालं आहे. उमेश यादवने ख्रिस वोक्सला 18 धावांवर असताना के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 193/8)

 • 06 Sep 2021 07:51 PM (IST)

  लॉर्ड शार्दुलकडून जो रुटची शिकार, सामना भारताच्या हातात

  शार्दुल ठाकूरने या सामन्यात भारताचं पुनरागमन केलं आहे. त्याने धोकादायक जो रुटला बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला आहे. रुटने 36 धावांचं योगदान दिलं. (इंग्लंड 182/7)

 • 06 Sep 2021 07:46 PM (IST)

  रुट-वोक्सची जोडी जमली, 35 धावांची भागीदारी

  जो रुट आणि ख्रिस वोक्सची जोडी मैदानात सेट झाली आहे. दोघांनी आतापर्यंत 35 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ सामन्यात पुनरागमन करतोय असं दिसू लागलं आहे. (इंग्लंड 182/6)

 • 06 Sep 2021 06:55 PM (IST)

  IND vs ENG : इंग्लंडला सहावा झटका

  अवघ्या काही मिनिटांत इंग्लंडते एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. आता जाडेजाच्या फिरकीसमोर मोईन अली सूर्यकुमारच्या हातात झेल देऊन बाद झाला आहे.

 • 06 Sep 2021 06:49 PM (IST)

  IND vs ENG : बुमराहला आणखी एक यश

  जसप्रीत बुमराहने आणखी एक यश मिळवत इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोवला शून्यावर माघारी धाडलं आहे.

 • 06 Sep 2021 06:41 PM (IST)

  IND vs ENG: ओली पोप बाद, बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण

  भारताचा महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने ओली पोपला बाद करत इंग्लंडला चौथा झटका दिला आहे. यासोबतच बुमराहने 100 कसोटी विकेट्सही पूर्ण केले आहेत.

   

 • 06 Sep 2021 06:23 PM (IST)

  IND vs ENG: भारताला तिसरं यश, इंग्लंडचा महत्त्वाचा फलंदाज बाद

  चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात सुरुवातीपासून सेट असणाराल फलंदाज हासिब हमीद बाद झाला आहे. रवींद्र जाडेजाच्या फिरकीने हासिबला बाद केलं आहे. इंग्लंडचे तीन गडी तंबूत परतले आहेत.

 • 06 Sep 2021 06:14 PM (IST)

  IND vs ENG: दुसऱ्या सेशनला सुरुवात

  पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून कर्णधार जो रुट आणि हासिब हमिद फलंदाजी करत असून जाडेजा गोलंदाजी करत आहे.

 • 06 Sep 2021 05:38 PM (IST)

  IND vs ENG: सामन्यात लंच ब्रेक, इंग्लंड 131/2

  दिवसांच पहिलं सेशन संपलं आहे. पहिल्या सत्रात इंग्लंडने बर्न्स आणि मलान यांच्या विकेटच्या बदल्यानत 131 धावांपर्यंत मजल मारली आहे.

 • 06 Sep 2021 05:12 PM (IST)

  IND vs ENG: इंग्लंडला दुसरा झटका

  इंग्लंडचा दुसरा गडी बाद झाला आहे. डेविड मलान 5 धावा करुन तंबूत परतला आहे. मयंकच्या मदतीने पंतने डेविडला धावचीत केलं आहे.

 • 06 Sep 2021 05:04 PM (IST)

  IND vs ENG: मोहम्मद सिराज गोलंदाजीला

  शार्दूलने एक विकेट मिळवल्यानंतर पुन्हा इंग्लंडचे फलंदाज उत्तम फलंदाजी करत आहेत. त्यामुळे विराटने मोहम्मद सिराजच्या हातात चेंडू सोपवला आहे.

 • 06 Sep 2021 04:11 PM (IST)

  IND vs ENG: शार्दूलने मिळवला पहिला विकेट, बर्न्स बाद

  नुकतंच अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडच्या धाव फलकावर 100 धावा जोडणाऱ्या रॉरी बर्न्सला शार्दूल ठाकूरने बाद केलं आहे. ऋषभ पंतने रॉरीचा विकेट घेतला आहे.

 • 06 Sep 2021 03:59 PM (IST)

  IND vs ENG: इंग्लंडकडून संयमी फलंदाजी

  पाचव्या दिवशीचा खेळ संथगतीने सुरु आहे. भारताकडून बुमराह आणि यादव भेदक गोलंदाजी करत आहेत. पण इंग्लंडचे फलंदाज हमी आणि बर्न्सही संयमी फलंदाजी करत आहेत.

 • 06 Sep 2021 03:32 PM (IST)

  IND vs ENG : भारताकडून उमेश यादवची सुरुवात

  भारताकडून उमेश यादवने गोलंदाजीची सुरुवात केली आहे. पहिल्या डावात रुटसारखा महत्त्वाचा विकेट घेणाऱ्या यादवकडून या डावातही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.

 • 06 Sep 2021 03:31 PM (IST)

  IND vs ENG : निर्णायक दिवसाचा खेळ सुरु

  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंडला विजयासाठी 291 धावांची गरज आहे.

Published On - Sep 06,2021 3:29 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI