AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 1st Day : साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 11:10 PM
Share

India vs New Zealand Live Score : भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट म्हणजे सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 1st Day : साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : India vs New Zealand WTC Final 2021 : पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या उभय संघांमध्ये होणार आहे. साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) आजपासून या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे हा सामना 19 जून ते 23 जूनदरम्यान खेळवला जाईल. (India vs New Zealand live score WTC Final 2021 1st Day Match Scorecard online Southampton in marathi)

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 18 Jun 2021 07:21 PM (IST)

    साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरुच, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

    साऊथॅम्प्टनमध्ये अजूनही पाऊस सुरुच आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

  • 18 Jun 2021 06:22 PM (IST)

    साऊथॅम्प्टनमध्ये अजूनही पाऊस सुरु, दुसऱ्या सत्रावरही प्रश्नचिन्ह

  • 18 Jun 2021 02:44 PM (IST)

    ‘जिसे डरते थे वहीं बात हो गयी’, फायनलची खराब सुरुवात, पावसामुळे पहिलं सेशन रद्द!

    भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.

  • 18 Jun 2021 02:19 PM (IST)

    India vs New Zealand : टॉसचा बॉस कोण होणार?

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात टॉसचा बॉस कोण होणार, याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

  • 18 Jun 2021 02:18 PM (IST)

    भारताने टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करावी की फिल्डिंग? गांगुली म्हणतो, ‘बॅटिंग करावी’!

    अंतिम सामन्याचं मैदान मारणं ही भारतासाठी सर्वांत मोठी संधी आहे. माझ्या कर्णधार विराटसह सगळ्या संघाला शुभेच्छा आहेत. सगळ्याच खेळाडूंनी मोठ्या मेहनीतने इथपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय संघ आज अंतिम सामना खेळतो आहे. अंतिम सामना खेळताना संघावर दबाव जरुर असेल. पण भारतीय टीमने दबाव झुगारन खेळावं. अंतिम सामन्यात जर भारताने टॉस जिंकला तर विराटने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.

  • 18 Jun 2021 02:17 PM (IST)

    पुढच्या काही मिनिटांत टॉस होणार

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2021) सुरुवात व्हायला अगदी काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि किवी कर्णधार केन विल्यमसन टॉससाठी मैदानात येतील.

Published On - Jun 18,2021 2:08 PM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.