Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध गंभीरसह या क्रिकेटपटूंचा वाद, तणावपूर्ण स्थितीत घेतला होता असा निर्णय
आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हा सामना होत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. त्यात भारत पाकिस्तान सामन्याला वादाची किनार काही नवीन नाही. आशिया कप स्पर्धेत गौतम गंभीरसह अनेक क्रिकेटपटूंची नावे वादात अडकली आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती भारत पाकिस्तान सामन्याची… भारतात या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, बीसीसीआय आणि सरकार आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेचं कारण पुढे करत सामना होत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सामन्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. असं असताना भारत पाकिस्तान सामन्यात वाद काही नवीन नाही. दोन्ही संघाचे खेळाडू आणि त्यांच्या खेळाडूंच्या आक्रमकतेने या स्पर्धेला वादाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. यात भारत आणि पाकिस्तानकडून पाच खेळाडूत भर मैदानात राडा झाला होता. यात गौतम गंभीर, हरभजन सिंग, शोएब अख्तर, कामरान अकमल आणि आसिफ अली या खेळाडूंची नाव आघाडीवर आहेत. इतकंच काय आशिया कप इतिहासात भारत पाकिस्तान संघाने टोकाचा निर्णय घेतला होता. काय ते सविस्तर जाणून घ्या..
भारत आणि पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली होती
श्रीलंकेतील अंतर्गत कलहामुळे भारताने 1986 मध्ये आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. भारताने आपला संघ पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर 1990 चत्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने आपला संघ भारतात पाठवला नव्हता. गेल्या काही वर्षात दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कृत्यामुळे भारताने सर्व संबंध तोडले आहे. द्विपक्षीय मालिका तर आता होतच नाहीत. आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ खेळतात.
आशिया कप 2010 स्पर्धेत गंभीर विरुद्ध कामरान हा वाद
आशिया कप 2010 स्पर्धेत टीम इंडियाचा सध्याच्या प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर पंचांनी पुढाकार घेत कसंबसं प्रकरण सोडवलं होतं. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हा वाद झाला होता. पण हा वाद गैरसमजातून झाल्याचं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं होतं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही तुम्ही भारत-पाकिस्तान सामना पाहणार का? #AsiaCup2025 #PAKvsIND #INDvsPAK #Bcci #TeamIndia #IndianCricketTeam
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2025
हरभजन सिंग आणि शोएब अख्तर
आशिया कप 2010 स्पर्धेत हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यातील वादही सर्वश्रूत आहे. या दोन्ही खेळाडूत मैदानात वाद झाला होता. अख्तरने मुलाखतीतही या वादाचा उल्लेख केला होता. अख्तरने सांगितलं की, लढाई पुढे नेण्यासाठी हरभजनच्या हॉटेल रूममध्ये गेलो होतो. पण दोघांमधील प्रकरण नंतर निवळलं.
आशिया कप 2022 स्पर्धेतही वाद
आशिया कप 2022 स्पर्धेतही वाद झाला होता. तेव्हा पाकिस्तानचा क्रिकेटपटू आसिफ अली वादात अडकला होता. तेव्हा अफगाणिस्तानच्या फरीद अहमदशी वाद झाला होता. आसिफ अलीला बाद केल्यानंतर फरीद त्यांचा आनंद साजरा करत होता. तेव्हा आसिफला राग अनावर झाला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंच्या सामना फी मधून 25 टक्के रक्कम कापली होती.
